मठ-कुडाळ-पणदूर-घोटगे रस्त्याचे आठ दिवसात खड्डे बुजवा; अन्यथा महाराष्ट्र सैनिकांच्या रोषास सामोरे जाल
▪️आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची टू व्हीलर वरून वरात काढणार; मनसेचा निर्धार
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.२२: मठ-कुडाळ-पणदूर-घोडगे या रस्त्याची खड्डेमय परिस्थितीमुळे झालेली दुर्दशा आणि त्यातून जनतेला होणारा मनस्ताप यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर व मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वेळोवेळी निवेदने व आंदोलनांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाची समज दिलेली आहे. परंतु निर्ढावलेल्या या भ्रष्ट व बेजबाबदार अधिकाऱ्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिल्याने जनतेमध्ये प्रचंड उद्रेकाची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता येत्या आठ दिवसात या रस्त्यावरील खड्डे भरणा करून रस्ता सुस्थितीत न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची जनतेच्या तीव्र भावना दर्शवण्यायसाठी व रस्त्यांची खड्डेमय परिस्थितिने झालेली दुर्दशा दाखवण्यासाठी आता टु व्हीलरनेच वरात काढली जाईल त्याशिवाय पर्याय उरला नाही. निवेदनांमधून विनंतीची भाषा व आंदोलनांद्वारे दिलेली समज या अधिकाऱ्यांना कळून येत नसेल तर आता महाराष्ट्र सैनिकांच्या रोषाला सामोरे जा म्हणजे जबाबदारी व कर्तव्ये आपोआप उमजून येतील, असा कडक इशारा मनसेच्या वतीने उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

