लाड पागेे,अनुकंपा भरती प्रक्रिया,हाफकीन संस्थेमार्फत आरोग्य उपकरणे खरेदी मधील अनियमितता यांसारख्या जि.प. गैर कारभाराच्या घटना..

▪️सत्ताधाऱ्यांसहित विरोधी पक्षाचे जि.प. सदस्य मूक गिळून गप्प का; मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल..

▪️’तेरी भी चूप.. मेरी भी चूप’ अशी सत्ताधारी भाजप व विरोधी शिवसेनेची पडद्यामागील छुपी युती जनतेसमोर उघड..!

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.३०: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये काही भ्रष्ट अधिकारी व कसर्मचारी यांच्या संगनमतातून झालेल्या गैरकारभारांची अनेक प्रकरणे अलीकडील काळात समोर  आली आहेत. यामध्ये विशेषतः लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार  परजिल्ह्यातील भरती केलेले उमेदवार असो, अनुकंपा तत्वावर भरती प्रक्रियेतील अनियमितता असो की हापकिन या बाह्यस्त संस्थेला आरोग्य उपकरणे खरेदीसाठी देण्यात आलेेले २७ लाख रुपयांचे प्रकरण असो अशी प्रकरणे उघड होऊन  देखील जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मधील सत्ताधारी भाजप व विरोधी शिवसेना यांचे जिल्हा परिषद सदस्य याबाबत चकार शब्द काढायला तयार नाहित हे सिंधुदुर्गवासी यांचे खरे दुर्दैव म्हणावे लागेल.कंत्राटी कामांसाठी जी कर्तव्यदक्षता दाखवण्यात येते जनतेच्या प्रश्नांबाबत व जिल्हा वासियांच्या निगडित विषयांबाबत दाखवण्यात येत नाही असे एकंदर चित्र आहे.उलट छुपी युती करून एकमेकाना सावरून घेत करू भ्रष्ट प्रवृत्तींना पाठीशी घालायचे व आपली कामे करून घ्यायची ही कार्यपद्धती  ही पद्धत जिल्ह्यातील जनता आता ओळखून चुकलेली आहे.जिल्हा परिषदेमध्ये परजिल्ह्यातील भ्रष्ट कर्मचारी अधिकारी यांचे रॅकेट कार्यरत असून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दडपशाही करून महत्वाच्या पदभारांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवतात  अशा काही तक्रारी सर्रासपणे कानावर येतात मात्र जिल्हा परिषद सदस्य त्याबाबत कधी पोटतिडकीने बोलताना दिसत नाहीत ही खरी शोकांतिका आहे. ‘आंधळं दळतंय व कुत्रं पीठ खातयं’ असा कारभार चालला असताना जिल्हा परिषदेत जनतेने निवडून दिलेले ‘कारभारी’ मात्र चिडीचूप का बसले आहेत याचा जनतेनेच विचार करावा असे आवाहन मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!