कुडाळराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

अवैध व्यवसायांचे समूह उच्चाटन करून वाममार्गाला लागलेल्या तरुण पिढीला सावरणे हेच मनसेचे प्रमुख उद्दिष्ट; यासाठी संघटीतपणे लढा देवूया

▪️आपल्या परिसरात चालणाऱ्या मटका, जुगार, ड्रग्ज-गांजा विक्री, बेकायदेशीर दारू विक्री आदि अवैध व्यवसायाबाबत महाराष्ट्र सैनिकांना सविस्तर माहिती द्या..

▪️मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे व विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचे जनतेला आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.०८: जिल्ह्यात सर्वत्र जुगार, मटका, गांजा व ड्रग्ज विक्री आणि गावठीसह गोवा बनावटीची दारू विक्री आदि अवैध व्यवसाय कोरोना संचारबंदी कालावधीपासून फोफावू लागत असल्याने जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढू लागल्याचे चित्र आहे. अशा अनैतिक व्यवसायांवर  पोलीस कर्मचारी नियंत्रण आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. मात्र, अपुऱ्या कर्मचारी बळामुळे या अवैध व्यवसायांचे मुळासकट उच्चाटन होण्यास मर्यादा येत आहे. शिवाय काही भ्रष्ट कर्मचारी अशा व्यावसायिकांना अर्थपूर्ण संबंधांतून पाठीशी घालत असल्याने त्यांची दहशत निर्माण होवून काही ठिकाणी माफियाराज बोकाळल्याची  परिस्थिती निर्माण झालेली पहावयास मिळते. आजची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन अक्षरशः बरबाद होत आहे. अशा असंख्य पालकांच्याच तक्रारी मनसेकडे प्राप्त होवू लागल्या आहेत. लोक लज्जेस्तव आपण बोलू शकत नसल्याची भावना व्यथित होत पालक बोलून दाखवत आहेत.

मनसे याबाबत तीव्र आक्रमक असून अवैध व्यवसायांच्या विरोधात मैदानात उतरली असून पोलीसांना या मोहिमेत सहकार्य म्हणून बेकायदा व्यवसायांची ठिकाणे, व्यावसायिक आदींबाबत माहिती पुरवून कठोर कारवाईसाठी आग्रही राहणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरणार आहे. देशाची भावी पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन निष्क्रिय बनू नये यासाठी मनसेचे सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक कार्यतत्पर आहेत. या समूह उच्चाटनाच्या लढाईत जनतेने देखील सामील होवून आपल्या परिसरात बेकायदा दारु विक्री, जुगार, मटका,गांजा व ड्रग्ज विक्री आदि अवैध व्यवसाय होत असल्यास महाराष्ट्र सैनिकांशी संपर्क साधून सविस्तर माहिती कळवावी असे आवाहन मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे व विद्यार्थी सेना जिहाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले असून अशा बेकायदा व्यवसायांची माहिती देणाऱ्या  सुजाण नागरिकांची नावे गुपित ठेवण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!