सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये जाण्यास कारणीभुत लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी पक्ष जबाबदार – परशुराम उपरकर
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकींग
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. २५ सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा रेड झोन होण्यास सत्ताधारी पालकमंत्री, खासदार व आमदार जबाबदार आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही अवस्था झालेली आहे.
आतापर्यंत ६०० च्या वरती रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियेतेमुळे सिंधुदुर्ग रेडझोन होण्यास जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला.
जिल्हा रुग्णालयातील नर्सेसच्या आंदोलनामुळे वास्तव जनतेसमोर आले आहे. मागण्यांसाठी नर्सेसना या कोरोनाच्या कालावधीत आंदोलन करावे लागते, ही खुप मोठी वाईट गोष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे.
कोविड रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांचा पुढाकार आवश्यक आहे. इतर वेळी हेच खासगी डॉक्टर सेवा देतात, आता मागे का राहतात? जिल्ह्यातील ज्या लोकांनी खासदार, आमदारांना निवडुन दिले. त्या लोकांचा आता कोरोनामुळे मृत्यु होत असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.
जिल्हा रुग्णालयातील सेवा कोडमडली आहे. पीएम केअरला अद्याप व्हेंटिलेटर जोडले गेले नाहीत. व्हेंटिलेटरवर गेल्यावर लोक मरत आहेत. पालकमंत्र्यांच्या घोषणा प्रत्यक्षात येत नाहीत. अद्याप शव वहिनी दिली नाही. रुग्णवाहिका दिल्या, पण अद्याप चालक नाहीत. रॅपिड टेस्ट वाढवल्याने रुग्ण मिळत आहेत, पण त्यांच्यावर उपचार होत नाहीत. जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी जनतेसाठी सेवा देण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी सांगताहेत डॉक्टर सेवा द्यायला तयार नाहीत. मुबंईप्रमाणे खासगी डॉक्टरांनी पुढे येण्याची गरज आहे.
पालकमंत्री पोकळ घोषणा करताहेत. जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचा मयत झाला. जिल्हा रुग्णालयात पेशंटसोबतचे नातेवाईक तिथेच राहत आहेत. झोपतात आणि मग घरी जातात. याच कारणामुळे कोरोना प्रसार होत आहे.
डॉ. नागेश पवार यांची बदली रद्द केली पाहिजे. त्यांना जिल्हात काम करायचे आहे. पालकमंत्री यांनी बदली थांबवण्यासाठी काम केले पाहिजे. गेल्या लाटेत डॉ. पवार यांनी चांगले काम केले असल्याचे परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.
केवळ खरेदीसाठी सत्ताधारी नेत्यांचा प्रयत्न आहे. नर्सेसना त्रास डॉक्टर देत आहेत, त्रास दिलेला डॉक्टर पालकमंत्री बोलुन देखील बैठकीत येत नाही. सिव्हील सर्जन चार्ज आहे, त्यांना बोलुन काय होणार? त्यामुळे मेडिकल कॉलेजसाठी ५०० मंजुर असलेले डॉक्टर, कर्मचारी भरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी मनसेच्या वतीने परशुराम उपरकर यांनी केली आहे.

