आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

HRCT, कोविडबाबत अन्य तपासण्या, रुग्णालयातील शासन दर, बेड चार्ज याबाबत प्रांताधिकारी यांच्याकडे अर्ज – दया मेस्त्री

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

 ✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ०३ शासनाच्या नियमावलीप्रमाणे HRCT, CT Scan व अन्य तपासणी करणार्‍या लॅबमध्ये भरमसाठ आकारणी करीत असुन पालकमंत्र्यांनी मागील दौर्‍यात HRCT चाचणी दर हा ३ हजारपेक्षा जास्त घेऊ नये, असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे शासनाचा दर तसाच ठरलेला आहे. तशाप्रकारचा शासन निर्णय असतानाही कणकवली खाजगी लॅबमध्ये ५ ते ७ हजार दर आकारतात, ते तातडीने कमी करण्यात यावे. यापुर्वी खाजगी लॅबमध्ये संबंधित रुग्णांना ज्यांच्या तपासण्या केलेल्या आहेत. त्यांची ज्यादा रक्कम घेतलेली असुन, ती रक्कम परत करण्यास भाग पाडावे.

शासनाने सुरुवातीच्या काळापासुन खाजगी रुग्णालयांना बेड चार्ज ऑक्सिजन नसलेला व असलेला, व्हेंटिलेटर बेडचे दर निश्चित करून तसा अध्यादेश काढलेला आहे. आता अ वर्ग, ब वर्ग आणि क वर्ग अशाप्रकारे वर्गवारी करून आत्ताच आरोग्य मंत्राने दर निश्चित केलेले आहेत. सदर शासन अध्यादेशाप्रमाणे दर आकारण्याकरिता रूग्णालयांना भाग पाडावे. रुग्णालयांना रुग्ण बरा होऊन घरी सोडताना त्याने उपचारासाठी पैसे भरलेल्या बिलांची पक्क्या पावत्या व फाईल त्याच दिवशी देण्याची सुचना करण्यात यावी.

आगाऊ रक्कम जमा केलेल्या पक्क्या पावत्या सुद्धा त्याचवेळी देण्यात याव्यात. खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्णांच्या नातेवाईकांकडुन रोखीत रक्कम मागतात. ज्यांच्याकडे रोखीत रक्कम नसेल त्यांना नेटबँकिंग, कार्ड, चेकद्वारे घेण्याचे त्यांना आदेश काढण्यात यावेत.

आपणाकडुन तत्काळ कारवाई करण्यात यावी व आपल्या खाजगी रुग्णालय कोविड नियंत्रण समितिमार्फत मागील दाखल असलेल्या सर्व कोविड रुग्णांची बिले तपासुन अतिरिक्त बिले घेतली असल्यास, त्याची छाननी करून ज्यादा पैसे घेतलेले रुग्णांना परत करण्याचे आदेश आपणाकडून व्हावेत. तसे शासनाचे आदेश देखील आहेत. असे असताना आपल्या तालुका, जिल्हा भरारी पथकाकडुन चौकशी करण्यास सांगावे. फक्त पत्रव्यवहार न करता जातिनिशी आपण या तीन तालुक्याचे प्रशासन प्रमुख म्हणुन होणार्‍या गैरव्यवहारात स्वत: जातिनिशी लक्ष घालुन हॉस्पिटलने व लॅब यांनी आकारलेली जादा रक्कम संबंधी रुग्णांना परत मिळवुन देण्याची आपल्या स्तरावर कार्यवाही व्हावी, अन्यथा पुढील आठवड्यात जनतेच्या मागणीनुसार कोणत्याही दिवशी कोविडचे नियम पाळुन घंटानाद आंदोलन आपल्या कार्यालयासमोर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

असा अर्ज प्रांताधिकारी कार्यालय कणकवली यांच्याकडे सुपुर्द केला, यावेळी दया मेस्त्री, शांताराम सादये, संतोष कुडाळकर, प्रशांत उपरकर, योगेश कदम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!