नांदगाव गावात महावितरणाच्या लाइनमन, वायरमन यांचा भाजपच्या वतीने सत्कार
🎥कोकण लाईव्ह ब्रेकींग
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. २५ नांदगाव गावात महावितरणाच्या लाइनमन, वायरमन यांचा नांदगाव भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. ८ दिवसापुर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे नांदगांव गावामधील वीज वितरण कंपनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे २ दिवस विज पुरवठा खंडित झाला होता.
खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी नांदगाव येथील विजवितरण कंपनीचे नांदगाव शाखा अभियंता प्रवीण पंडित, यांच्यासह लाईनमन दयानंद कदम, कौस्तुभ नाडकर्णी, सूर्यकांत सावंत, नरेंद्र महाडेश्वर, सुनील इंदप, समीर म्हस्के, मनोज बोभाटे, गवस तांबोळी, श्यामसुंदर पाडावे, प्रकाश जगताप या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम घेऊन २ दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत केला.
त्यामुळे त्यांच्या या कामगिरी बद्दल नांदगाव भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर, सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, हनुमंत वाळके, मजिद बटवाले, कमलेश पाटील, राजु खोत आदी उपस्थित होते.

