Friday, September 25, 2026
Latest:
आपत्कालीन

इन्सुलीत विजेचा लोळ पडुन औताचा बैल मृत्युमुखी

 

इन्सुली पागावाडी मुळीकवाडा येथील प्रभाकर मांजरेकर यांच्या औताचा एक मोठा बैल चार महिन्यांपूर्वी अचानक मरण पावला त्यानंतर त्यांच्याकडे औताचा बैल नव्हता,बैल घेण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा नव्हती पण माजी पंचायत समिती सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांनी पुढाकार घेऊन त्यांचे सहकारी विनायक दळवी,नाना पेडणेकर,बापू कोठावळे,संतोष मेस्त्री यांनी आर्थिक मदत म्हणून सुमारे वीस हजार रुपये किंमतीचा बैल त्यांना मृग नक्षत्रात आणून दिला.त्यानंतर त्यांनी शेत नांगरणीचे काम करून भातलावणीचे काम सुरू केले पण दुर्दैव आड आले आणि पुन्हा त्यांच्या जोडीचा बैल दिनांक ११.०७.२२ रोजी सायंकाळी विजेचा लोळ पडून मृत्युमुखी पडला श्री.मांजरेकर यांच्यावर मोठा आघात झाला,त्यांच्यावर आलेल्या या प्रसंगाला बबन राणे यांनी धाव घेत जागेवर जाऊन पुढील शासकीय मदत मिळवण्याचे सोपस्कार केले.या प्रसंगाबद्दल पागावाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!