नुकसानग्रस्त भागाची जि.प.सदस्य सुधीर नकाशेंनी केली पाहणी
तौक्ते वादळाचा मोठा फटका वैभववाडी तालुक्याला बसला असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जि प सदस्य सुधीर नकाशे यांच्या समवेत पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी वैभववाडी तालुक्यातील करुळ गावाला भेट देत नुकसानग्रस्त घराची पाहणी केली. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश भोवड, गजानन पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तहसीलदार तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांची यांची भेट घेऊन नुकसानभरपाई संदर्भात चर्चा करुन त्वरीत पंचनामे करुन जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी करणार आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे, बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. घरांवर, गोठयांवर झाडे पडली आहेत, घराची छपरे उडुन गेली आहेत. तालुक्यातअनेक ठिकाणी विजेचे पोल पडुन विद्युतप्रवाह बंद पडलेला आहे. त्यामुळे अनेक गावांत पुढचे काही दिवस लाईट पण येणार नाही अशी परिस्थिती आहे.तरी ही तालुक्यात विज वितरण कंपनीची टिम युद्ध पातळीवर काम करत असून लवकरच विद्युत व्यवस्था सुरु करण्यात येईल असे सांगितले ग्रामस्थांनशी बोलताना नकाशे यांनी सांगितले.