कोरोनावर मात करून निरंतर सेवा देणारे कोविड योद्धा डॉ. शेखर पालकर रुग्णांसाठी दिलासादायक..

डॉ. पालकर यांचे श्रुती क्लिनिक ठरतेय रुग्णांना आधारस्थान..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.०७: शहरातील मार्कंडी येथे गेले अनेक वर्ष वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ शेखर पालकर हे कोरोना काळात रुग्णांसाठी योद्धा म्हणून धावून आल्याचे पाहण्यास मिळत आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून काही दिवस अपवाद वगळता निरंतर सेवा देणारे डॉक्टर पालकर हे रुग्णांना दिलासा देणारे ठरले.ज्यावेळी रुग्ण तपासायला सहसा कोणी धजावत न्हवते त्यावेळी रुग्णांना तपासण्याचे धाडस त्यांनी दाखविले.

घरात दोन वयस्कर व्यक्ती असताना केवळ रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांनी रुग्णसेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कोरोना पॉझिटिव्ह होऊन देखील रुग्ण सेवेमध्ये कोरोनटाईन कालावधी सोडला तर खंड पडून दिला नाही. कोरोना बाबत जनतेत संभ्रमावस्था असताना काही रुग्ण भीतीपोटी तपासणीला जात नव्हते अशावेळी  रुग्णांना  तपासून  योग्य ते निदान करून कोरोना लक्षणे आढळल्यास  त्या रुग्णाला संबंधित यंत्रणेकडे  पाठवण्याचे  मोठे काम देखील डॉक्टर पालकर यांनी कोरोनाच्या संकटात केले.
कोविड योद्धा म्हणून हे करत असताना ते स्वतः  कोरोना पॉझिटिव्ह झाले. अशावेळी त्यांनी अपरांत हॉस्पिटल मधील डॉ गौतम कुलकर्णी व डॉ हर्षद होन यांच्या सल्ल्यानुसार औषध घेऊन शासकीय नियमांचे पालन करून बरे झाले आहेत. सुरुवातीला रुग्ण तपासणी करताना लक्षण आढळणाऱ्या साधारण तीन-चार कोविड पेशंट दिवसाला कॉटेज हॉस्पिटल किंवा अन्य हॉस्पिटलला पाठवण्याचे महत्वाचे काम देखील या कालावधीत केले.यामुळे अनेकांना प्राथमिक अवस्थेतच निदान झाल्याने पुढील धोका टळल्याचे देखील उदाहरणे दिसून आली आहेत.

कोविड लक्षण नसताना केवळ भीती पोटी काही रुग्ण डॉक्टर कडे जाण्यास घाबरत असताना डॉ पालकर यांनी अतिशय दिलासादायक काम केले.कोरोना औषध येईपर्यंत रुग्णांना दिलासादायक ठरलेले डॉ शेखर पालकर यांच्या वैद्यकीय सेवेबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहेत.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2

*🔥घरच्या जेवणासह नाश्त्याची चव आता सावंतवाडीत तीही खिशाला परवडणारी…🔥*

    *_💥 आरोलकर खानावळ  💥_*
_शाकाहारी,मांसाहारी जेवण फक्त पार्सल सुविधा उपलब्ध…🛍️_

*🌈नाश्ता २० रुपये पासून!💰*
_घावणे चटणी,घावणे उसळ,शिरा,उपमा,पोहे,मिसळपाव,भजी,वडा,इडली,स्पेशल मेदूवडा,ब्रेड पकोडा…._

*🤷🏻‍♀️बुधवार,शुक्रवार,शनिवार,रविवार🤷🏻‍♂️*
😍 😝 _चिकन पाव_ 😝😍

*💂🏻‍♀️अस्सल मालवणी चुलीवरचे जेवण!*
_💫शाकाहारी जेवण ७० रुपये.._
_💫मांसाहारी जेवण ११० रुपये.._
_💫डबा घरपोच मिळेल.._
_💫पार्टी ऑर्डर्स स्विकारल्या जातील.._
_💫रोजच्या डब्याची ऑर्डर स्विकारली जाईल.._

*🔮संपर्क : महेश आरोलकर*
_तोरणे पाणंद, सबनिसवाडा,_
_सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग._
*_📱मोबाईल : 9867245572_*
*_7400237572_*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!