मोहन विद्यालय आकले येथे माजी विदयार्थ्यांचा गेट-टुगेदर सोहळा उत्साहात संपन्न
🟥मोहन विद्यालय आकले येथे माजी विदयार्थ्यांचा गेट-टुगेदर सोहळा उत्साहात संपन्न
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,२२: चिपळूण तालुक्यातील दसपटी विभाग श्री रामवरदायिनी शिक्षण संस्थेचे येथील मोहन विद्यालय येथे सन १९९१- ९२ च्या दहावी बॅच मधील माजी विदयार्थ्यांचा गेट-टुगेदर सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये स्वागत समारंभ माजी शिक्षक आणि मान्यवरांचा सत्कार शाळेला वस्तुरूप देणगी आणि माजी विद्यार्थ्यांचा चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला संस्थेचे विद्यमान पदाधिकारी बळीराम शिंदे ,मोहन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मिसाळ , चिपळूण अर्बन बँक चेअरमन , माजी विद्यार्थी सौ .राधिका पाथरे श्री. गवस , श्री मगर , श्री पाटोळे , श्री जाधव, माजी शिक्षक सौ .सुर्वे आणि मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला श्री राऊत , सौ जागुष्टे ,अशोक कदम , विनायक कदम,सीताराम लांबे , अनंत पवार या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी आणि कादवड चे प्रतिष्ठित ग्रामस्थ संदीप शिंदे आकले गावचे माजी सरपंच आणि शाळेचे माजी विद्यार्थी श्री गणेश गजमल आणि इतर मान्यवर उपस्थित होते शाळेला वस्तुरूप देणगी म्हणून ऑफिस कपाट आणि विज्ञान प्रयोगशाळा साहित्य शाळेच्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका सौ जोशी यांच्याकडे आणि मुख्याध्यापक श्री मिसाळ सर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पंकज कुडाळकर माजी विद्यार्थी मोहन विद्यालय आकले यांनी केले कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांमध्ये सौ प्रतिभा जोशी पाचांगणे सौ सारिका शिंदे कदम सौ सुनीता शिंदे सुर्वे सौ मनीषा मोहिते स्वाती पड्याळ संगीता कदम ,शंकर धाडवे, उज्वला कदम सुर्वे सौ स्मिता शिंदे सुर्वे,विजय वारोशे प्रशांत सकपाळ दीपक आदावडे विकास घडशी विनोद गमरे गौतम गमरे प्रवीण टाकळे हे माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते मंगेश चव्हाण राजू शेलार अनील कदम हे माजी विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर नसले तरी मनाने आमच्यासोबत होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थ्यांपैकी प्रवीण टाकळी प्रतिमा जोशी आणि पंकज कुडाळकर यांनी खूप मेहनत घेतली उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि माजी शिक्षकांचा आणि मान्यवरांचा सत्कार सन्मानचिन्ह ही परंपरा शाळेमध्ये नव्याने सुरू करण्यासाठी सर्वांनी आभार मानले माजी शिक्षक आणि प्रशाले प्रति सर्व माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली
सर्व सहभागी माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*
▪️ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ▪️
*⚫व्यवसाय वाढीसाठी गुंतवणूकदार 💵💴पाहिजेत🧑🏻💼👩🏻💼 लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार आमंत्रित*
🏠आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दर महा योग्य मोबदला💵🎊🎉 मिळवा..
*किंवा*
एक वर्षानंतर भरगोस परतावा मिळवा..
सर्व व्यवहार कायदेशीर अँग्रिमेंटने होतील.
*Contact :-* Hindustan Capital Securities
Shope no.4,- 1Floor, Aditya Busines Center Building, Gandhi Chouk, Sawantwadi.
Mob: *9403367839 / 7083369430*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

