आंबोली घाटात सापडलेल्या महिलेचा खूनच! मात्र; खुनाचा उद्देश स्पष्ट नाही
गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुले कशी आलीत? याबाबतची कारणे अस्पष्ट..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०६: आंबोली घाटात दरीत आढळलेल्या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सदर महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवताना गळा दाबून खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या खुणा बाबत माहिती देण्यासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी आज सावंतवाडी पोलीस स्थानकात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना खोत यांनी १ सप्टेंबर रोजी सदर महिला बेपत्ता झाल्याची तक्रार सावंतवाडी पोलीस स्थानकात देण्यात आली होती. त्यानंतर त्या महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू होते. पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांच्याकडे हा तपास देण्यात आला होता. त्यानंतर बेपत्ता तपास मळगाव, सावंतवाडी या ठिकाणी करण्यात आला.
तपास सुरू असताना ७ सप्टेंबर रोजी आंबोली घाटात एका महिलेचा मृतदेह आढळून आला, तो मृतदेह पूर्णपणे कुजला होता. डोक्याची कवटी व केस शिल्लक होते. अशा परिस्थितीत सदर महिलेचा पंचनामा करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. त्यावेळी तोंडातील दोन दात पडलेले आढळलेत. तो मृतदेह व शेजारी मिळालेल्या कपडे बेपत्ता महिलेच्या मुलाला दाखविण्यात आले. त्यावेळेस त्याने तो मृतदेह आपल्या आईचा नसल्याचे सांगितले.
म्हणून त्या मृतदेहाची हाडे डी.एन.ए. साठी पाठवण्यात आली व ह्या तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांची नवीन नेमणूक करण्यात आली. व पुन्हा तपास सुरू झाला. घराची झाडाझडती घेत असताना घरामध्ये मोबाईलचा बॉक्स आढळून आला. त्या बॉक्स वरील नंबरने पुढील सर्व माहिती उघड झाली. त्या नंबर वर आलेले फोन यांची माहिती मागून घेण्यात आली. त्यानंतर सुतावरून स्वर्ग गाठत आरोपींना जेरबंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक खोत यांनी दिली.
हा तपास पीएसआय गीते यांच्याकडे देण्यात आला. सोबत कविटकर, शिंदे या पोलिसांना घेऊन तपास सुरू झाला व आरोपी जेरबंद झालेत. ज्या गाडीतून हा मृतदेह आंबोली येथे नेला, त्या गाडीचा मालकाचा जबाब घेण्यात आला. त्याने ती गाडी बिट्टू नामक व्यक्तीला दिली होती असे सांगितले. बिट्टू नामक व्यक्तीने गुन्ह्यातील आरोपीला ती गाडी दिली होती. सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी बीट्टू नामक व्यक्तीकडून गाडी मागून घेतली होती. अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
या प्रकरणातील दोन आरोपी हे बालगुन्हेगार आहेत. दोघे जण सध्या पोलिस कोठडीत आहेत. या खुनाचे धागेदोरे अनैतिक धंद्यातून असल्याची चर्चा होती. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. या गुन्ह्यात त्या गावाबाहेरील दोन अल्पवयीन मुले कशी काय आलीत याही प्रश्नाचे उत्तर पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी दिले नाही.
कोणतेही धागेदोरे नसताना सावंतवाडी पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठून आरोपींना जेरबंद केले. मात्र, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन अन्य काही साथीदारांचा यात सहभाग आहे का याचाही तपास होणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
_😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे *सुर्या गॅस*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_