Sunday, August 16, 2026
Latest:
आपत्कालीनक्राइमसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मोरेतील प्रकाश मोर्ये यांच्यासह चालकाला मारहाण व गाडीचे नुकसान करून सोनसाखळीची चोरी; कोलगावातील प्रकार

▪️शाहिद शेख, एजाज शेख यांच्याविरुद्ध सावंतवाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल..

▪️चोराला सोडून संन्याशाला फाशी; पोलिसांच्या वर्तनाचा मोर्ये समर्थकांकडून आरोप

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१९: कोलगाव कुणकेरी फाटा येथे काल रात्री साडेदहच्या सुमारास सावंतवाडीहून माणगाव-मोरे च्या दिशेने जाणाऱ्या प्रकाश मोर्ये व त्यांचे चालक प्रकाश गोसावी यांची पोल्ट्री वाहतुकीची गाडी वाटेत अडवून त्यांना मारहाण करून गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी प्रकाश मोर्ये यांनी शाहिद शेख, एजाज शेख यांच्याविरुद्ध सावंतवाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. प्रकाश मोर्ये यांच्या गळ्यातील सोन्याची चैन संबंधितांनी हिसकावून घेतल्याचीही तक्रार प्रकाश मोर्ये यांची आहे. त्यांच्याविरुद्ध भा.द.वी कलम ३२४, ३२३, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री साडेदहाच्या सुमारास आपली पोल्ट्री वाहतुकीची गाडी घेऊन प्रकाश मोर्ये व त्यांचे चालक प्रकाश गोसावी सावंतवाडीत आले होते. सावंतवाडी पेट्रोल पंप वर डिझेल भरून ते पुन्हा माणगाव-मोरे येथे जात असताना कोलगाव-कुणकेरी फाटा येथे शाहिद शेख व एजाज शेख यांनी आपल्या  डोळ्यावर गाडीचा प्रकाश पडला असे सांगून गाडी थांबवली व त्यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण केली व दुसऱ्याने दगडाने गाडीच्या काचा फोडल्या प्रकाश मोर्ये यांच्या पाठीवर दगडांचा मारा केला. आरडा-ओरड केल्यावर  ग्रामस्थ जमा झालेत व त्यांची सोडवणूक केली.

याप्रकरणी प्रकाश मोर्ये यांनी सावंतवाडी पोलिस स्थानकात वरील दोन्ही इसमांनी आपली गाडी वाटेत थांबून मारहाण करून आपल्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली व पळून गेले अशी फिर्याद दिली होती. मात्र, पोलिसांनी  फिर्यादीत सोनसाखळी गहाळ झाल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रकाश मोर्ये यांनी आपण पोलिसांना संबंधितांनी गळ्यातील चेन हिसकावून घेण्यात असल्याचे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल शी बोलताना सांगितले.

सदर घटनेचे वृत्त समजतात माणगाव व शिवापूर खोऱ्यातील प्रकाश मोर्ये यांचे सगेसोयरे, मित्र सावंतवाडीत दाखल झालेत. नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला व परस्परविरोधी तक्रार घेतली व प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सावंतवाडी तहसील कार्यालयात चॅप्टर केस दाखल करण्यात आली. मात्र, या प्रकाश मोर्ये समर्थकांनी आक्षेप घेऊन चोराला सोडून संन्याशाला फाशी अशा प्रकारचे पोलिसांचे वर्तन असल्याचा आरोप केला. ज्या लोकांनी रस्त्यात गाडी अडवली, तोडफोड केली, मारहाण केली, त्यांची उलट तक्रार घेऊन दोन समाजात तेढ निर्माण होते. असा शोध लावून चॅप्टर केस दाखल केल्याप्रकरणी जोरदार आक्षेप घेतला व पोलिसांच्या या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. यापुढे असे प्रकार घडू नयेत याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी असे आवाहन माजी सभापती मोहन सावंत यांनी केले व घडलेल्या घटनेचा निषेध केला.

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_

💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..

_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻‍♂️*_

*💁🏻‍♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻‍♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!