राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत आता रेस्टॉरंट, हॉटेल्स, फूड कोर्ट आणि बारना सशर्त परवानगी; जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.06: मिशन बिगीन अगेन अंतर्गत जिल्ह्यात आता रेस्टॉरंट, हॉटेल्स, फूड कोर्ट आणि बारना सशर्त परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. सदर आस्थापना या 50 टक्के क्षमतेसह सदर बाबी सुरु करण्यासाठी घ्यावयाच्या आवश्यक दक्षतेबाबत पर्यटन विभाग यांच्याकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना प्रमाणे सुरू राहणार आहेत.
तसेच जिल्ह्यात शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण, शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी दि. 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत प्रतिबंधित असतील. तथापि ऑनलाईन, दुरस्थ शिक्षणास परवानगी असेल. चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे आणि सभागृहे, नाट्यगृहे (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्ससह) ऑडिटोरियम असेंब्ली हॉल या सारखे तत्सम सर्व ठिकाणे बंद राहतील. एमएचए ने परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणारे मेळावे प्रतिबंधित असतील. सर्व प्रकारची जीवनाश्यक वस्तु असलेली दुकाने, आस्थापना या कार्यालयाकडून या पूर्वीच्या आदेशांप्रमाणे यापुढेही सुरु राहतील. या पूर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेल्या बाबी, क्षेत्रे पूर्ववत सुरू राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास सलग्नित राहतील. तसेच सदरचे आदेश 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत लागू राहतील.
ऑक्सिजन उत्पादन व वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या हालचालीस कोणत्याही प्रकारचे बंधन असणार नाहीत. तसेच कोविड 19 विषाणू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय निर्देशानचे पालन करण्यात यावेत. यामध्ये सर्व नागरिकांना सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी मास्क, चेहरा झाकण्याचे साधन वापरणे बंधनकारक असेल. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच वाहतुकी दरम्यान सर्व नागरिकांनी सामाजिक अंतराचा निकष पाळणे बंधनकारक असेल. दुकान व दुकान परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती, गिऱ्हाईक यांना प्रतिबंध असेल. तसेच उपस्थित असलेल्या व्यक्ती, गिऱ्हाईकामध्ये 6 फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारक असेल. मोठ्या प्रमाणात उपस्थितीतीने आयोजित करण्यात येणारे मेळावे, समारंभ हे प्रतिबंधित असतील तथापि विवाह कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त 50 नातेवाईक तसेच अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त 20 नातेवाईक, नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहण्यास परवानगी असेल. सामाजिक अथवा कामाच्या ठिकाणी थुंकणे दंडनीय असेल. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखु तंबाखुजन्य पदार्थ खाण्यास व थुंकण्यास मनाई आहे. कामाच्या ठिकाणी शक्यतोवर काम हे घरातून करणे ही बाब पाळण्यात यावीत. कार्यालय आस्थापना मधील सर्व प्रवेश व बाहेर पडण्याच्या ठिकाणी तसेच कार्यालयातील सार्वजनिक प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. सार्वजनिक वापर असलेल्या ठिकाणी ज्या मानवाचा जास्त संपर्क येतो अशा ठिकाणी उदा. दरवाजाचे हॅंन्डल इ. बाबी वारंवार निरजंतुकीकरण करण्यात यावेत. कामाच्या ठिकाणी कामगारांमध्ये पुरेसे अंतर कामाच्या वेळे दरम्यान पुरेसे अंतर त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळेमध्ये सामाजिक अंतराचा निकष पाळला जावा.
सदरचे आदेश पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहित 1860 (45) च्या कलम 188, तसेच साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कार्यवाही करण्यात येईल. तरी सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*🔥घरच्या जेवणासह नाश्त्याची चव आता सावंतवाडीत तीही खिशाला परवडणारी…🔥*
*_💥 आरोलकर खानावळ 💥_*
_शाकाहारी,मांसाहारी जेवण फक्त पार्सल सुविधा उपलब्ध…🛍️_
*🌈नाश्ता २० रुपये पासून!💰*
_घावणे चटणी,घावणे उसळ,शिरा,उपमा,पोहे,मिसळपाव,भजी,वडा,इडली,स्पेशल मेदूवडा,ब्रेड पकोडा…._
*🤷🏻♀️बुधवार,शुक्रवार,शनिवार,रविवार🤷🏻♂️*
😍 😝 _चिकन पाव_ 😝😍
*💂🏻♀️अस्सल मालवणी चुलीवरचे जेवण!*
_💫शाकाहारी जेवण ७० रुपये.._
_💫मांसाहारी जेवण ११० रुपये.._
_💫डबा घरपोच मिळेल.._
_💫पार्टी ऑर्डर्स स्विकारल्या जातील.._
_💫रोजच्या डब्याची ऑर्डर स्विकारली जाईल.._
*🔮संपर्क : महेश आरोलकर*
_तोरणे पाणंद, सबनिसवाडा,_
_सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग._
*_📱मोबाईल : 9867245572_*
*_7400237572_*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_