क्राइमसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोकण लाईव्हच्या दणक्यानंतर राज्य उत्पादन शुल्क खाते झाले जागे..

▪️काल रात्रौ पकडली गोवा ते मुंबई जाणाऱ्या ट्रकात  ४४ लाखांची दारू..

▪️दोन्ही संशयित आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी

🎴सावंतवाडी,दि.२१: कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने गोव्यातून महाराष्ट्र राज्यात पुरवठा होणारा अवैध दारू साठा याविरुद्ध सातत्याने आवाज उठविल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क अधिकारी जागे झाले असून आज गोवा ते मुंबई अशा भंगार भरलेल्या ट्रक मधून दारूची वाहतूक करत असताना पोलिसांनी इन्सुली डोबाशेळ फाटा येथे शेख सत्तार शेख कासीम पटेल, रा नांदेड तारासिंग पाटील वय ५० राहणार नांदेड व मदन इंग्रजीत यादव वय ४०, रा. मध्यप्रदेश या दोघांना ४४ लाखांंच्या दारूसह अटक केली आहे. आज त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने अँड. स्वप्नील कोलगावकर यांनी काम पाहिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेले पंधरा दिवस कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल गोव्यातून पुरवठा होणाऱ्या अवैध दारूसाठ्याबद्दल सातत्याने लिखाण करून राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांना जागे करण्याचे काम केले होते. राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी तशा प्रकारचे आदेश दिलेत. त्यानंतर झोपी गेलेले उत्पादन शुल्क अधिकारी जागे झाले व छोटे-मोठी कारवाई करू लागलेत. काल त्यांना गोव्यातून मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला व रात्री एकच्या सुमारास एक संशयास्पद ट्रक गोवा ते मुंबई च्या दीशेने जात असताना दिसला. त्यावेळी त्याला थांबवण्याचा इशारा केला असता तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना गाडी आडवी घालून त्याची तपासणी केली असता गाडीत दारूचे बॉक्स आढळून आलेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!