अवैध दारू वाहतुक करणारा ट्रक ताब्यात

◾उत्पादन शुल्क विभागाने ३२ लाख ४० हजार किमतीची दारू केली जप्त…

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २९ शहरातील गड नदीजवळ असलेल्या कळसुली फाट्यावर राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्गच्या कणकवली पथकाने कारवाई करत, अवैध दारू वाहतुक करणारा ट्रक ताब्यात घेतला आहे. उत्पादन शुल्क विभागाने 32 लाख 40 हजार रुपये किमतीची दारू जप्त केली आहे.

यामध्ये मल्टी एक्सल (ओपन बॉडी) ट्रकमध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीच्या एका बॉक्समध्ये ४८ याप्रमाणे ४५० बॉक्समध्ये १८० मिली मापाच्या १९२०० सिलबंद बाटल्या मिळुन आले. मिळून आलेल्या मदयाची व ट्रकची एकूण किंमत ४३,४१,००० रुपये इतकी आहे.

सदर दारू वाहतुक कामी वापरण्यात आलेला ट्रक (आरजे-११/जीए-४२७१) जप्त करण्यात आला असून, या ट्रकच्या चालकाचे नाव कृष्णा दुलराम शितोळे (वय ३२) असे आहे. तो मध्यप्रदेशचा रहिवासी आहे.

या कारवाईमध्ये कणकवली येथील दुय्यम निरीक्षक जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ लक्ष्मण राणे, एस. एस. चौधरी, वाहनचालक मुपडे, स्नेहल कुवेसकर यांनी सहभाग घेतला. मदतनीस म्हणून खान, साजीद शहा यांनी केली.

सदर गुन्ह्याचे पुढील तपासकाम राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्गचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!