◾आमदार प्रसाद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश मोरे यांनी राबविला अनोखा उपक्रम..
◾कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचा केला सन्मान..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-२९ :- जिथे परिस्थिती गंभीर तिथे सतिश मोरे खंबीर अशी संपूर्ण चिपळूण तालुक्यात ओळख निर्माण झालेल्या भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष सतीश मोरे यांनी आपल्या पक्षाचे नेते भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्या वाढदिवसानिमिती कोरोना आजारात मृत पावलेल्या लोकांवर अंत्यसंकार करणाऱ्या चिपळूण नगरपालिका कर्मचाऱ्यांचा अनोखा सन्मान केला.
चिपळूण शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी येथे कोरोनामुळे मृत पावलेल्या लोकांना अग्नी दिला जातो. याठिकाणी नगरपालिकेचे काही निवडक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्यांचे आरोग्य नीट राहावे या भावनेतून भारतीय जनता पार्टी चिपळूणचे माजी तालुकाध्यक्ष सतीशजी मोरे यांनी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांना पीपीई कीटचे वाटप केले. त्याचबरोबर पाच हजार रुपये रोख रक्कम, सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज अशा वस्तूंचे वाटप केले. सामाजिक कार्यात मोरे नेहमीच अग्रेसर असतात.मोरे यांनी सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या उपक्रमामुळे नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अमोलजी भोबसकर, भाजयुमो तालुका सरचिटणीस मंदार कदम, वैभव निवाते , भाऊ पवार , मुकादम .सुशील सकपाळ , संकेत मोहिते, सफाई कर्मचारी निलेश जाधव, तुषार कांबळे. अंकित गमरे, चेतन चिपळूणकर, दीपक सावर्डेकर, विराज सकपाळ, सुमेध कांबळे, अनिल तांबिटकर, तेजस जाधव, सचिन हरवडे आदि उपस्थित होते.स्वखर्चाने कामथे उपजिल्हा रुग्णालयात दररोज दहा ऑक्सिजन सिलेंडर देऊन सतीश मोरे अनोखी सामाजिक बांधिलकी जपत आहेत.

