नाशिक भरारी पथकाची मोठी कारवाई सावंतवाडीतील तिघांना अटक 45 लाखाचा मुद्देमाल जप्त

नाशिक उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोहदरी शिवारात सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री ग्रस्त घालत असताना गोवा बनावटीच्या अवैध दारूसह तीन वाहनांना ताब्यात घेऊन एकूण 45 लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, यात सावंतवाडीतील अजय सुर्यकांत कवठणकर, भटवाडीतील जतीन गुरुदास गावडे तर चराठा वजरवाडी येथील सतीश संतोष कळंगुटकर या आरोपींचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की नायगाव नाशिक पुणे महामार्गावर महोदरी शिवारात येथे रात्री राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या पथकाची गस्त सुरू असताना गोवा राज्यातून आलेला अवैध दारू साठा एका मागे एक अशी तीन वाहने पोलिसांनी जप्त केली ,सहा चाकी वाहन एम एच 46 23 98 या वाहनाची तपासणी केली असता तिच्या विदेशी कंपनीच्या 750 मिली च्या व्हिस्कीच्या तीन हजार सहाशे सीलबंद बाटल्या म्हणजेच 300 बॉक्स सदरच्या वाहनात आढळून आले,

तसेच यावेळी सदरच्या टेम्पोच्या पुढे मागे देखरेख करणारी वाहने एम एच ०७ ए जी ९१९९ तर पाठीमागे असलेली स्विफ्ट एम एच 16 सी व्ही 3122 ही दोन्ही वाहने या पथकाने ताब्यात घेतली, यामध्ये यांमध्ये अहमदनगर येथील नारायण भगवान गिरी ,सातारा येथील सुनील रामचंद्र कांबळे, सावंतवाडी येथील अजय सूर्यकांत कवठणकर , रवींद्र दत्ताराम कासेगावकर पुणे, जतीन गुरुदास गावडे सावंतवाडी, सतीष संतोष कळंगुटकर चराठा वझरवाडी, सुभाष सखाराम गोधडे, अहमदनगर ,अशोक बाळासाहेब हाडे अहमदनगर अशा नऊ आरोपींना अटक करून त्यांच्याकडील तीन वाहनासह 45 लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई प्रभारी उपाधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्रमांक एकचे निरीक्षक जयराम जाखेरे ,दुय्यम निरीक्षक रोहित केरीपाळे, जे पी साबळे, यशपाल पाटील, जवान सुनील दिघोळे ,धनंजय पवार ,राहुल पवार, राजकुमार चव्हाण ,अनिता भांड, किंवा आधीच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक शशिकांत गर्जे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!