थरारक पाठलाग करून गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणाऱ्याला रंगेहाथ पकडले…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०२ थरारक पाठलाग करून गोवा बनावटीची अवैध दारूची वाहतूक करताना रंगेहाथ पकडून कणकवली पोलिसांनी तब्बल ४ लाख ४२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ०२ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वा. १० मिनिटांनी हि कारवाई फत्ते केली.
सचिन प्रभाकर वेलीप ( वय ३०, रा.केवना, शिवना दक्षिण गोवा ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांना गोवा बनावटीची वाहतूक होणार असल्याची टीप मिळाली होती. पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ०२ एप्रिल रोजी मध्यरात्री हायवेवर सापळा रचला होता. गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी संशयित वॅगणार कार ( GA -09 – D-2020 ) दिसताच पोलीसानी थांबण्याचा इशारा केला.
मात्र कार न थांबताच सुसाट तळेरेच्या दिशेने गेली. ए. एस. आय. बापू खरात, वाहतूक पोलीस संदेश आबीटकर, रुपेश गुरव यांनी कारचा थरारक पाठलाग करून तळेरे एस. टी. स्टँड येथे कार पकडली.
कारमध्ये ३७ बॉक्समध्ये गोवा बनावटीच्या हनी गाईड ब्रॅण्डिंच्या १ हजार ७७६ दारूच्या बाटल्या सापडल्या. अवैध दारूची किंमत १ लाख ४२ हजार ८० असून, गुन्ह्यात जप्त केलेली कारची किंमत ३ लाख आहे.
याबाबत वाहतूक पोलीस संदेश आबीटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.