◾दोडामार्गातुन गोव्यात कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांना दोन दिवसांची मुदत..
◾त्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची ; दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात मोफत आरटीपीसीआर टेस्ट ची सुविधा..
◾तहसीलदार अरूण खानोलकर यांची माहिती..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि-१९ :- दोडामार्ग तालुक्यातुन गोव्यात काम निमित्त ये – जा करणाऱ्यांसाठी दोन दिवसाची मुभा देण्यात आली आहे. दोन दिवसांनंतर ये – जा करणाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची होणार आहे. एकदा आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर पुढील दहा दिवस गोव्यात जाण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे. तशा सूचना सोमवारी सायंकाळ पासून चेकपोस्ट वर देण्यात सुरूवात केली आहे.
आरटीपीसीआर टेस्ट ची सुविधा दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात असून ती सुविधा मोफत असल्याचे तहसीलदार खानोलकर यांनी सांगितले. दोडामार्ग सोबतच आयी, सासोली या ठिकाणी देखील नव्याने चेकपोस्ट उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे तहसीलदार खानोलकर यांनी सांगितले आहे.
तसेच पेट्रोल साठी मुभा देण्यात येईल का? या विषयावर बोलताना त्यांनी पोलीस प्रशासनाशी बोलून त्याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल असे तहसीलदार खानोलकर यांनी सांगितले आहे.