बांदा बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट- ३ व्यक्ती पॉझिटिव्ह
उद्या बांदा बाजारपेठेत कडकडीत बंद
बांदा,प्रतिनिधी:शैलेश गवस
बांदा,१९:-शहरात विनाकारण बाजारपेठेत फिरणार्यांची आज रॅपिड तपासणी करण्यात येत आहे. दहाहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली असून तीघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील घटनास्थळी ठाण मांडून आहेत. बाजारपेठेत येणार्यांची चौकशी करुनच सोडण्यात येत आहे. रॅपिड टेस्ट करण्यात येत असल्याने बाजारपेठेत नाहक येणार्यांची संख्या बर्यापैकी कमी झाली आहे. शहरात सध्या तुरळक नागरिक फिरताना दिसत आहेत.
बांदा गावातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत बांदा ,आरोग्य केंद्र बांदा,व्यापारी संघ बांदा आणि पोलिस स्टेशन बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने आवाहन करण्यात येते की फक्त मंगळवारी बांदा गावातील सर्व दुकाने किराणा दुकान,शेतीमाल दुकान,भाजीपाला दुकान,हॉटेल व्यवसाय,मेडिकल स्टोअर्स सर्व अस्थापने बंद ठेऊन सहकार्य करावे.जर दुकान उघडे आ ढळल्यास एक हजार रुपये दंड आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची दुकानदारांनी यांची नोंद घ्यावी.असे आवाहन बांदा सरपंच अक्रम खान यांनी केले.