◾चिपळुणात महाशिबिरात ९२ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-१९ :- कोरोना सारख्या महामारीने रौद्र रूप धारण केल्यामुळे महा भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज हजारो लोकांचा रोज मृत्यू होत आहे. देशात सर्वात बिकट स्थिती असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत आणि त्यामुळे अनेकांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार , आरोग्य मंत्री श्री. राजेशजी टोपे यांनी प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान शिबिर आयोजित करावे असे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद म्हणून चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार श्री. शेखरजी निकम यांच्या नेतृत्वाने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, चिपळूण, अपरांत हॉस्पिटल, रोटरी क्लब, चिपळूण, रोटरॅक्ट क्लब चीपळून, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभागीय केंद्र- रत्नागिरी, चिपळूण तालुक्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटना आणि जनकल्याण रक्तपेढी महाड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी अपरांत हॉस्पिटल , चिपळूण येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. कोरोना सारख्या कठीण प्रसंगात तब्बल रक्तदात्यांची रक्तदानासाठी नोंद झाली होती. आणि त्यापैकी ९२ रक्तदात्यांना रक्तदानाचा अधिकार बजावता आला.
सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन अपरांत हॉस्पिटल चिपळूण येथे आमदार श्री. शेखरजी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. प्रशांत देवळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी अपरांत हॉस्पिटलचे डॉक्टर श्री.यतीन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.चित्राताई चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य आणि युवती महिला जिल्हाध्यक्ष सौ. दिशा दाभोळकर , जिल्हा परिषद सदस्या सौ मीनल काणेकर, चिपळूण पंचायत समितीच्या सभापती सौ. रिया कांबळे ,उपसभापती श्री पांडुरंग माळी, माजी नगरसेवक श्री. अरुण भोजने , युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के ,महिला शहराध्यक्ष दीपिका कोतवडेकर, नगरसेवक तथा सभापती बिलाल पालकर ,महिला तालुकाध्यक्षा जागृती शिंदे , चिपळुणातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळेस तब्बल १०२ वेळा रक्तदान करून या शिबिरासाठी १०३ व्या वेळी रक्तदान करण्यासाठी उपस्थित असलेले देवरूख येथील सामाजिक कार्यकर्ते उदय गणपत कोळवणकर यांचा तालुक्याचे आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अमोल टाकळे आणि प्रशांत देवळेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच शिबिराला विशेष सहकार्य करणाऱ्या संघटनांमध्ये महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे सचिव अमोल भोबस्कर , महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रकाश गांधी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सचिव रविंद्र मोहिते, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज पवार, प्राथमिक उर्दू शिक्षक संघटनेचे ताज खान, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र महाडिक तसेच चिपळूण तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे रोहित जाधव, संजय चव्हाण, विजय वनवे, तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ सुरवसे, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, अरुण शिगवण, विकास चांदे तसेच शिक्षक क्रांती संघटनेचे भंडारी सर यांचा सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे पालन करून गौरव करण्यात आला.
सदर शिबिरामध्ये तरुणांपासून ५८ वयोगटातील व्यक्तींपर्यंत अनेकांनी उस्फूर्तपणे नियमानुसार रक्तदान केले. सदर रक्तदात्यांना जनकल्याण रक्तपेढी महाड यांच्या वतीने तसेच आयोजकांच्या वतीने प्रशस्तीपत्र व अल्पोपहार देण्यात आला. सर्व रक्तदात्यांनी आयोजकांचे मनस्वी आभार व्यक्त केले सदर रक्तदान शिबिराला चिपळूण विधानसभा क्षेत्र प्रमुख दादा साळवी, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, चिपळूणचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, युवा नेते अनिरुद्ध शेखर निकम, अर्बन बँकेचे माजी चेअरमन सतीश खेडेकर, माजी शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, माजी नगरसेविका आदिती देशपांडे, किसन चिपळूणकर, रोटरीचे माजी अध्यक्ष वैभव रेडीज, शैलेंद्र सावंत, प्रसाद सागवेकर,राजा ओतारी,खजिनदार मनोज जैन, विनोद घुमरे, तुषार बीजीतकर, एबीपी माझा वाहिनीचे रविंद्र कोकाटे, आपलं कोकणचे महेंद्र कासेकर तसेच रंजीता ओतारी, अक्षय केदारी, नदीम उंडरे, ऋतुजा चौगुले, प्रणिता घाडगे, जानवी फोडकर, शैला पवार, प्रमोद गोपाळ,अतुल संसारे, मल्लेश लकेश्री, सचिन कांबळी, पराग पुरोहित,दिगंबर सुर्वे, मानस गुढेकर यांसह अनेकांनी प्रमुख अतिथी तसेच त्यापैकी काही जणांनी रक्तदाते म्हणून सदिच्छा भेट दिली.
सदर शिबिराच्या शेवटी आयोजकांच्या वतीने जनकल्याण रक्तपेढी महाडच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.तसेच जनकल्याण रक्तपेढी मार्फत आयोजकांचा देखील सन्मान करण्यात आला.
कोरोना सारख्या कठीण परिस्थितीत सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे पालन करून नियोजनबद्ध संपन्न केलेल्या महा रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी सिद्धेश लाड, मनोज जाधव, अमोल टाकळे, विश्वनाथ कांबळे, प्रशांत देवळेकर, प्रकाश गांधी, सचिन साडविलकर, अरुण शिगवण, अल्हाद यादव, सिद्धेश जाधव , क्षितीज जाधव , सोहेल मुजावर, राजेश दांडेकर, कृष्णमूर्ती ,अमर भोसले यांच्यासह विविध प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

