◾जोपर्यंत विमा संरक्षण आणि कोरोना लसीकरण होत नाही,तोपर्यंत सरपंच समिती नियंत्रण समितीची जबाबदारी घेणार नाही ; दादा साईल
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,दि-१६ :- ग्राम नियंत्रण समिती अध्यक्ष म्हणून सर्व सरपंचांनी मागच्या लॉकडाउन मध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती राज्याच्या मानाने आटोक्यात होती..
परंतु कोरोना कालावधी संपल्यानंतर प्रशासनाला “गरज सरो वैद्य मरो” या उक्तीप्रमाणे सगळ्याचा जाणीवपूर्वक विसर पडला होता.
आता पुन्हा एकदा प्रशासन खडबडून जागे झाले आहे.. आणि कोरोना नियंत्रण समितीला पुन्हा एकदा जबाबदारी आणि कर्तव्याची आठवण करून देत आहे.
खर म्हणजे Front Line Workers म्हणून कोरोना कालावधीत फिल्ड वर काम करणाऱ्या आरोग्य, पोलिस इ. कर्मचाऱ्यांच्या बरोबर ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पण कोरोना लसीकरण केले गेले.
पण ज्यांनी या सगळ्यात मोलाची जबाबदारी पार पडली त्या कोरोना नियंत्रण समितीचा मात्र प्रशासनला विसर पडला हे मोठे दुर्दैवाने म्हणावे लागते.
त्यामुळे सरपंच आणि ग्राम नियंत्रण समिती सदस्य याना पालकमंत्री यांनी शब्द दिल्या नुसार विमा संरक्षण आणि कोरोना लसीकरण होत नाही तोपर्यंत कोणीही सरपंच नियंत्रण समितीची जबाबदारी घेणार नाहीत .असे कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दादा साईल यांनी सांगितले.