◾खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या रक्तदान शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-१६ :- कोव्हिड १९ च्या काळात महाराष्ट्रात रक्ताची मोठी गरज असल्याने खेड तालुका, शहर आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे रक्तदान शिबीर आज दि. १६ एप्रिल २०२१ रोजी द.ग. तटकरे सभागृह खेड येथे आयोजीत करण्यात आले होते
सदर रक्तदान शिबीराचे उदघाटन मा आमदार शेख़र निकम यांचे हस्ते पार पडले. शिबीराला खेड शहरा मधुन तसेच ग्रामीण भागातुन ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
कोव्हीड १९ च्या महामारी मध्ये आपला महाराष्ट्र संकटात असताना व लाॅकडाऊन असताना आणि राज्यात रक्ताचा तुटवडा असताना रक्तदात्यांनी उत्फुर्तपणे रक्तदान करुन ७५ रक्तदात्यांनी आपले आद्य कर्तव्य निभावले.
सदर शिबीराला जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव,स तु कदम,अरविंद आंब्रे, संजय आंब्रे, सुरेश मोरे, योगेश शिर्के, जिल्हा परिषद सदस्या सौ. सिद्धी पवार,नफीसा परकार पंचायत समिती सदस्य अॅड तु ल डफले ,नगरसेवक इलयास खतीब,संजय जाधव,जलाल राजपुरकर श्रीधर गवळी ,सचिन पवार, मुखत्यार कावलेकर,मनोज कदम,तुषार सापटे,मंदार शिर्के,प्रणव म्हापुसकर, सुनील चव्हाण,जमिर मुल्लाजी सरपंच सावर्डे,सर्व मा.जिल्हा परीषद सदस्य,मा नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेकरीता आरोग्य विभाग रत्नागिरीची टिम,डॉ कांबळे,डाॅ सावंत व सर्व कर्मचारी आणि सतिश उर्फ पप्पू चिकणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड शहर अध्यक्ष, अँड अश्विन भोसले तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस खेड यांनी काम पाहीले.