महिला दिनानिमित्त नगरसेवक आशिष खातु यांच्यातर्फे महिलांना पदार्थांचे प्रशिक्षण…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळुण : दि. ०८ रविवार दिनांक ७ मार्च रोजी भारतीय जनता पक्षाचे चिपळूण शहराध्यक्ष व नगरसेवक आशिष खातू यांच्या तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक ९ मधील महिलांसाठी विविध प्रकारचे मोदक प्रशिक्षण व पूजेसाठी करावयाचा शिरा यांचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम खेंड येथील परांजपे हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा सौ. सुरेखा ताई खेराडे, नगरसेविका रसिका देवळेकर, नुपूर बाचीम, तसेच सुनंदा खेडेकर स्नेहलता खातू, रचना गोंधळी, चित्रा मजलेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी लिम्का बुक मध्ये नोंद असलेले प्रसन्न कांबळी यांनी महिलांना विविध प्रकारचे मोदक वे शिरा बनविण्याचे प्रशिक्षण दिले. यावेळी कार्यक्रमाला सारिका भांड,अपर्णा खातू, सई वरवाटकर व खेंड, उक्ताड कानसे वाडी येथील महिला भगिनी उपस्थित होत्या. प्रशिक्षणाच्या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल परांजपे शाळेचे सुरेश पाथरे यांचे आयोजकांतर्फे आभार मानण्यात आले.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

