आणखीकोकणराजकीयवैभववाडीसिंधुदुर्ग

माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी : दि. ०८ वाभवे – वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांनी ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त उपोषण केले. दरम्यान नगरविकास जिल्हा प्रशासन अधिकारी वाळके यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधुन प्रलंबित मागण्याबाबत येत्या ८ दिवसांत वैभववाडी नगरपंचायतीमध्ये बैठक घेऊन, सर्व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले.

वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीमार्फत केलेल्या कामांची थकीत बिले अध्याप दिलेली नाहीत. काही कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासुन काम करत आहेत, त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे, नगरपंचायत प्रशासनामार्फत वैभववाडीतील जनतेला चुकीची माहिती देली जात आहे. कर्मचाऱ्यांमार्फत चुकीच्या पद्धतीने काही घर मालकांवर कारवाई केली जात आहे. चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नये, नगरपंचायतीमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी २५ लाख रुपये खर्च करूनही अद्यापही वैभववाडी शहराला वेळेत पाणी मिळत नाही. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग रचनेनुसार मतदार नोंदणीसाठी त्या प्रभागातील घर मालकांचा पुरावा द्यावा. काही शहरातील बांधकामांना नगरपंचायतीमार्फत परवानगी दिली जात नाही, परवानगी देण्यास विलंब केला जात आहे. अशा अनेक समस्यांबाबत माजी नगराध्यक्ष अक्षता जैतापकर यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वैभववाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

उपोषणाला वैभववाडी शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, संभाजी रावराणे, काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष मीनाताई बोडके यांनी उपोषणस्थळी जाऊन पाठिंबा दिला.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!