कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑हुमरस सुपुत्र कृष्णा लाड यांना राष्ट्रीय दशावतार कलाकार पुरस्कार प्रदान.

*🛑हुमरस सुपुत्र कृष्णा लाड यांना राष्ट्रीय दशावतार कलाकार पुरस्कार प्रदान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* गोव्यातील कला व संस्कृती भवन (सेंट्रल लायब्ररी) येथे आर्ट्स, टुरिझम अ‍ॅण्ड कल्चर फेस्टिव्हल समिती, गोवा तसेच श्री नागेश महारुद्र फाउंडेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकगौरव सन्मान परिषदेत दशावतारात नारदाची भुमिका साकारत असलेले सावंतवाडी तालुक्यातील आकेरी–हुमरस येथील युवा दशावतार कलाकार कृष्णा उर्फ साहिल शंकर लाड यांना राष्ट्रीय दशावतार कलाकार पुरस्कारe प्रदान करून गौरविण्यात आले.

या परिषदेत कला, संस्कृती आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. दशावतार या पारंपरिक लोककलेच्या जतन, संवर्धन व प्रचारासाठी तसेच समाजहितासाठी केलेल्या निष्ठावंत, सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत कृष्णा लाड यांना मान्यवरांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

लाड यांनी दशावतार नाट्यकलेची सुरुवात इयत्ता चौथीमध्ये शालेय स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून केली. लहान वयातच या कलेविषयी विशेष रुची दाखवत त्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, साधना आणि प्रयोगशीलतेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर तरुण वयात त्यांनी सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ, मुंबई; खानोलकर दशावतार नाट्य मंडळ, खानोली; बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळ, दोडामार्ग; रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ, हुमरस आदी विविध नामवंत मंडळांतून त्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. सध्या ते आरोस–दांडेली येथील जय हनुमान दशावतार नाट्य मंडळात कार्यरत आहेत. पहाडी आणि गोड असा नैसर्गिक आवाज लाभलेले कृष्णा लाड दशावतार नाट्यकलेत नारदाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारतात. त्यांच्या आवाजातील ठसकेबाज चढउतार, स्पष्ट उच्चार आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे नारदाचा स्वभाव, विनोद आणि उपदेशात्मक आशय प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचतो. अभिनयासोबतच गायन आणि संवादफेकीतील नेमकेपणा ही त्यांच्या भूमिकेची खास ओळख ठरली असून, प्रत्येक प्रयोगात ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे दशावतार रंगभूमीवर नारदाची भूमिका म्हटली की कृष्णा लाड यांचे नाव आवर्जून घेतले जाते.

दशावतार क्षेत्रात लाड यांना शंकर पिळणकर, गोविंद मराठे, शंकर मेत्री, गणवत मांजरेकर, विलास गवस, दादा राणे–कोनसकर, गौरव शिर्के, सिद्धार्थ मेस्त्री, नारायण आसयेकर, ज्ञानेश्वर नाईक, अर्जुन सावंत यांसारखे नामवंत कलाकार त्यांना गुरु म्हणून लाभले. तसेच पंढरी घाटकर, प्रथमेश मेस्त्री व रमेश शिरोडकर हे कलाकार त्यांचे आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले. “या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे व विशेषतः दादा राणे–कोनसकर यांच्या पाठपुराव्यामुळेच हा पुरस्कार मिळू शकला,” अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली. पुरस्कारबाबत बोलताना लाड म्हणाले, दशावतार क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या कार्याची पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेली ही पोचपावती अत्यंत आनंददायी आहे. या सन्मानामुळे मनात नवचैतन्य निर्माण झाले आहे. हा पुरस्कार केवळ सन्मान न राहता, पुढील काळात दशावतार ही पारंपरिक लोककला अधिक जोमाने जपण्यासाठी, जोपासण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठे प्रेरणास्थान ठरणार आहे. असे लाड यांनी पुरस्काराबाबत बोलताना सांगितले.

या पुरस्कारामुळे दुमरस गावासह परिसरात व इतर अनेक ठिकाणी कृष्णा लाड यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हुमरस परिसरासह संपूर्ण दशावतार कला क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!