पालिकेने अग्निशमन केंद्रासाठी दिला आहे प्रस्ताव-संजू परब
पालिकेने अग्निशमन केंद्रासाठी दिला आहे प्रस्ताव
जिल्हा नियोजन सभेत मिळणार मंजूरी
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे अद्ययावत अग्निशमन केंद्राच्या इमारतीसाठीचा ( टाईप – ४ ) प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.. त्यासाठी अडीज कोटींची मागणी आहे तर आग्निशमन बंबासाठी ७७ लाखांचा प्रस्ताव दिला आहे. हे दोन्ही प्रस्ताव आता जिल्हा नियोजन सभेत मंजूरीसाठी जाणार असून अध्यक्ष या नात्याने पालकमंत्र्यांनी त्याला त्वरीत मंजूरी द्यावी व बापूसाहेबांच्या पावन भूमीत दिलेला शब्द पाळावा तसे झाल्यास त्यांच्या हस्तेच त्याचा शुभारंभ करू, अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर व नासीर शेख उपस्थित होते. मागील सत्ताधारी गेल्या २५ वर्षात साधा अग्निशमन बंब घेऊ शकले नाहीत. १९९७ पासूनचा बंब वापरला जात होता. त्यामुळे आता तो निर्लेखित केला जाणार असून नवीन बंबाची मागणी करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली
+