आपत्कालीनकोकण

दोडामार्ग ते विजघर मार्गावरील खराडी येथे कोसळलेली दरड करण्यात आली बाजूला..

_*🛑 दोडामार्ग ते विजघर मार्गावरील खराडी येथे कोसळलेली दरड करण्यात आली बाजूला..*_

_*🛑 रस्ता पुन्हा एकदा वाहतुकी साठी सज्ज..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-२८ :-* दोडामार्ग ते विजघर मार्गावर चार दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे विजघर खराडी येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दरड कोसळुन रस्त्यावर आली होती.त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.स्थानिक युवकांनी एका बाजुने लहान वाहने जाण्यासाठी वाट मोकळी केली होती. पण मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. अखेर विजघर केंद्रे येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई, प्रदिप गावडे,विजय कांबळे यांनी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याशी संपर्क साधून बांधकाम विभाग यांना कळवुन जेसीबी मशीन पाठवायला सांगितले आणि अखेर विजघर घाटीवडे येथील दरडी बाजुला केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!