शिवसेनेच्या आजी-माजी पालकमंत्र्यांनी चार वेळा पक्ष बदलले, त्यांना लायसन्स कोणी दिले; नगराध्यक्ष संजू परब
▪️निवडणुकीच्या वेळी राजन तेली यांच्याकडे पे-रोलवर खबरीचे काम करणाऱ्या रुपेश राऊळ यांनी स्वाभिमान शिकूवू नये..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड
🎴सावंतवाडी,दि.१५: सध्याचे पालकमंत्री उदय सामंत, तसेच माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आता पर्यत किती पक्ष बदलले. व उदय सामंत हे यापूर्वी शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथे मन रमले नाही म्हणून राष्ट्रवादीत गेले व आता पुन्हा शिवसेनेत आले. तसेच माजी पालकमंत्री दिपक केसरकर हे देखील यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला व तेथून शिवसेनेत आले व आता भाजपामध्ये येण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. तरी या सगळयांमध्ये या शिवसेना नेत्यांना पक्ष बदलण्याचे लायसन्स कोणी दिले आहे का, याचा खुलासा श्री. रुपेश राऊळ यांनी करावा. असे आवाहन सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.
रुपेश राऊळ हे राजन तेली यांचेकडे शिवसेनेच्या खबऱ्या सांगण्यासाठी पे-रोलवर होते. तसेच निवडणूकीच्यावेळी रु. ५ लाख घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणून भेटवत होते. त्यांनी विकाऊ स्वाभिमानावर बोलणे योग्य आहे का असा सवाल नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे.
कालच्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये तुमचे आमदार खासदार पालकमंत्री असूनसुध्दा सावंतवाडी तालुक्यात ११ पैकी ८ ग्रामपंचायती ह्या भाजपाच्या निवडून आल्या, त्याचे कारणसुध्दा आपल्यासारखे स्वाभिमान गहाण ठेवलेले पदाधिकारीच जबाबदार आहेत. त्यामुळे यापुढे जेवढी जास्त टिका कराल, तेवढाच चांगला रिझल्ट भाजपाला मिळणार आहे.माझेवर किंवा राजन तेली यांचेवर टिका करण्याची रुपेश राऊळ यांची औकात आहे का… हे तपासून पहावे. असा सल्लाही परब यांनी रूपेश राऊळ यांना दिला आहे.यापुढे अशी टिका केली तर…. सडेतोड उत्तर देऊ असे परब प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥*
*_💥आपल्या बातम्या व जाहिराती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे विश्वसनीय माध्यम..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🤷🏻♂️आमचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे⬇️*
*_📱भ्रमणध्वनी +919423304856_*
*_🥏व्हाट्सॲप +918484827993_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

