खारेपाटण येथील राष्ट्रीय महामार्ग रस्ता रोको आंदोलन अधिकाऱ्यांच्या सकारात्मक चर्चेअंती मागे..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१५: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ च्या अंतर्गत येणाऱ्या खारेपाटण गावातील महामार्गाशी संबंधित असलेली अपूर्ण कामे न केल्यामुळे खारेपाटण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने दि.१५ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेले आंदोलन अखेर आज संबंधित अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून सदर आंदोलन मागे घेत असल्याचे सरपंच रमाकांत राऊत यांनी सांगितले. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्ह्यातील मनाई आदेश उठल्यानंतर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही सरपंच राऊत यांनी दिला.
यावेळी कणकवली तालुका पोलीस निरीक्षक संजय धुमाळ,सह्ययक पोलीस निरीक्षक अनमोल रावराणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सह्ययक अभियंता बी जि कुमावत,के सी सी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनोज पांडे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव,ग्रामविकास अधिकारी जि सी वेंगुर्लेकर,आरोग्य सेवक श्री खोत,आरोग्यसह्ययिका श्रीम.लक्ष्मी करोड,लवु चव्हाण, खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार उद्धव साबळे,आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.खारेपाटण सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय खारेपाटण येथे आज खारेपाटण सरपंच श्री रमाकांत राऊत व संबधित अधिकारी यांच्यात खारेपाटण येथील हायवेच्या अपूर्ण कामा बाबत चर्चा केली यावेळी के सी सी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सह्ययक अभियंता बी जि कुमावत यांनी खारेपाटण येथील हायवेच्या अपूर्ण कामांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची मान्यता घेऊन प्राधान्याने पूर्ण करून देण्यात येतील असे सांगितले.
दरम्यान आज खारेपाटण संभाजीनगर येथील सर्व्हिस रोडचे काम के सी सी कंपनीने तातडीने हाती घेऊन सुरू करणयात आले. तर उर्वरित कामे देखील टप्याटप्याने सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन हायवे प्राधिकरणाच्या वतीने ग्रामस्थांना देण्यात आले. तर खारेपाटण संभाजी नगर येथील विरेंद्र चिके व आप्पा ढेकणे यांची जमीन हायवे मध्ये गेली असून त्याचा मोबदला त्यांना अद्याप मिळालेला नाही.तरी संबंधितांना भूसंपादना चा मोबदला त्वरित देण्यात यावा अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी हायवे प्राधिकरणाकडे केली.
याबाबत प्रांत कणकवली यांच्याशी चर्चा करून त्यांचा जमिनीच्या मोबदल्याची प्रश्न सोडविण्यात येइल असे अभियंता बी जि कुमावत यांनी सांगितले.
खारेपाटण येथील हायवे शी निगडित खलील कामे अपूर्ण असल्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आले होते. 1)खारेपाटण संभाजी नगर येथे सर्व्हिस रोड तयार करणे.2)खारेपाटण रामेश्वर नगर येथे सर्व्हिस रोड तयार करणे 3)खारेपाटण मध्ये बस थांबे निवारा शेड बांधने.
4)खारेपाटण सुखनदी वरील अर्धवट स्थितीत असलेला पूलाचे काम पूर्ण करून तो 6 पदरी करण्यात यावा.5)महामार्गावर बसविन्यात आलेले विद्युत पोल तांत्रिक दृष्ट्या अयोग्य बसविण्यात आले आहेत.6)खारेपाटण बॉक्सवेल उंची वाढविण्या बाबत किंवा बदल करण्याबाबत.
7)खारेपाटण मध्ये गावात जाताना नियमांचे उल्लंघन करून महामार्गावरून वाहनचालकाना व नागरिकांना जावे लागत आहे.यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.उपाययोजना करावी.
8) खारेपाटण संभाजी नगर येथील रहिवाशी वीरेंद्र चिके व माधव ढेकणे यांच्या आरक्षित जमिनीचा मोबदला मिळणे आदी मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

