एडगाव पाष्टेवाडी येथे शेत विहिरीत सुमारे वीस फूट खोल गवा कोसळला..
▪️वनविभाग व स्थानिकांच्या अथक प्रयत्नानंतर गव्याची विहिरीतून सुखरूप सुटका..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.१५: एडगाव पाष्टेवाडी येथील श्रीमती लिलावती दशरथ पवार यांच्या मालकीच्या शेत विहिरीत सुमारे वीस फूट खोल गवा कोसळला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. दरम्यान दुपारी वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर गव्याची विहिरीतून सुखरूप सुटका करण्यात आली आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एडगाव पाष्टेवाडी येथील श्रीमती पवार यांच्या मालकीच्या शेत विहिरीत सोमवारी सकाळी गवा रेडा पडल्याची माहिती वैभववाडी वनपाल एस. एस. वागरे यांना मिळताच आपल्या टीमसह घटनास्थळी रवाना झाले. घरापासून शेत विहीर एक किलोमीटर अंतरावर असल्याने त्याठिकाणी जेसीबी जावू शकत नव्हता.
दरम्यान वनविभागाने तेथील ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीच्या एका बाजूला माती खोदून विहिरीत भराव टाकल्याने. गवा विहिरीतून बाहेर येवून जंगलाच्या दिशेने पलायन केले. यावेळी वनपाल एस. एस. वागरे, वनरक्षक ए. एच. काकतीकर, वनरक्षक पी. डी. पाटील, वनरक्षक एन. एम. लोखंडे, वनरक्षक आर. एल. बिक्कड, वनमजूर सी. एल. मराठे तसेच ग्रा. पं. सदस्य सौ. प्रज्ञा रावराणे, दत्ताराम पाष्टे, चंद्रभागा घाडी, सुर्यकांत पवार, सुनिल घाडी, रमेश घाडी, मधुसुदन घाडी आदींनी अथक परिश्रम घेतले.
_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_
*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*
*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*
*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*
_*🤷🏻♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_