शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा; पोलिस अधीक्षक यांच्याकडे भाजपचे निवेदन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१५: सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा झाल्यानंतर गेला आठवडाभर जिल्ह्यात राजकीय टीकाटिप्पणी सुरू झाल्या. यात शिवसेना पक्षाचे नेते व कार्यकत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले. त्याला साहजिकच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी प्रतिउत्तर दिले. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेश चिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. याला प्रतिउत्तर म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. असे असताना पोलिसांनी फक्त भाजपाच्याच कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले. ही कारवाई एकतर्फी केल्याचे दिसून येत असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे.
याबाबत भाजपा शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेत यांच्याकडे निवेदन दिले असून यावेळी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत, राजू राऊळ आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे, कायदा हा सर्वांसाठी एकच असल्यामुळे, एकतर आपण शिवसेना कार्यकर्त्यांवर पण गुन्हे दाखल करावेत. किवा भाजपाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे आपण तात्काळ मागे घ्यावे. अन्यथा भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाभर तीव्र आंदोलन उभे करेल. यास आपण केलेली पक्षपाती कारवाई जबाबदार राहील असा इशारा भाजपकडून पोलिसांना देण्यात आला आहे.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_