आ.नितेश राणे यांच्या माध्यमातून व नगराध्यक्ष नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवलीकरांची होणार भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासुन सुटका..
▪️सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन कोल्हापुर या संस्थेमार्फत आत्तापर्यंत २५७ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया पूर्ण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१५: नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली शहरात राबविण्यात येणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व अँटी रॅबीज लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत कणकवली शहरातील २५७ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन कोल्हापुर या संस्थेमार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशी योजना राबविणारी कणकवली पहिलीच नगरपंचायत ठरली आहे.
ही मोहीम सत्यात उतरल्याने कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव काही प्रमाणात कमी होऊ लागला आहे. नगराध्यक्ष नलावडे यांच्या संकल्पनेतुन पंधरा दिवसांपुर्वी योजना शहरात राबविण्यात आली. जानवली येथे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातुन उपलब्ध झालेल्या जागेत या भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यात येत आहे. एकावेळी सुमारे पस्तीस कुत्रे पकडण्यात येत असुन, त्यांना तीन दिवस देखरेखीखाली ठेवुन पुन्हा पकडलेल्या जागी सोडण्यात येत आहे. यामुळे येत्या काळात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रावापासुन कणकवलीकरांची सुटका होणार आहे.
कणकवली नगरपंचायतमार्फत नलावडे यांनी तातडीने ही मोहीम हाती घेतली. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली. दर तीन दिवसांनी पहाटे ५.३० वाजल्यापासुन या एजन्सीमार्फत शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे काम हाती घेण्यात येते. गेले पंधरा दिवस सातत्यपुर्ण हे काम सुरू असुन या मोहिमेला आता यश मिळु लागले आहे. त्यामुळे कणकवलीवासीयांतुन नगराध्यक्षांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

