आरवली ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते सत्कार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴वेंगुर्ले,दि.१४: तालुक्यातील आरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुरस्क्रुत आरवली विकास परिवर्तन पॅनेल पुर्ण बहुमताने विजयी होऊन एक इतिहास घडवून पक्षाची ताकद महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाला दाखवून देत शिवसेनेकडून खेचुन आणली. तसेच सरपंच पदाच्या निवडणुकीत अजुन एक चमत्कार घडवून पाच मते असताना सरपंच पदाचे उमेदवार तातोबा कुडव यांना सहा मते मिळाली, तसेच उपसरपंच पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे महिला मोर्चाच्या रीमा मेस्त्री बिनविरोध निवडून आल्या. अशा प्रकारे सर्व विरोधी पक्षांना धोबीपछाड देत भाजपा ने विजयाचा झेंडा आरवली ग्रामपंचायतीवर फडकवला. दरम्यान आज झालेल्या वेंगुर्ले तालुक्यातील बुथप्रमुखांच्या मेळाव्यात प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते विजयी शिलेदारांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. समिधा नाईक, प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर व नगरसेविका पुनम जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष डाॅ. पुजा कर्पे, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर आदी उपस्थित होते .
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

