म्हापण-कुशेवाडा भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आ. नितेश राणे यांच्याकडे जिओ टावरची मागणी..
▪️गावांत बीएसएनएल टाॅवर असून नसल्यासारखे यासाठी सुसज्ज जिओ नेटवर्कची नितांत आवश्यकता..
*🖥️ Kokan Live Breaking News*
✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴वेंगुर्ले,दि.०२: म्हापण व कुशेवाडा गावातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी म्हापण व कुशेवाडा या गावात जिओ टाॅवर व्हावे या मागणीसाठी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. या दोन्ही गावांतील ग्रामस्थांना इंटरनेट साठी शेजारील गावातील टाॅवरच्या इंटरनेटवर विसंबून राहावे लागत आहे. त्यामुळे संपूर्ण गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नाही. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात समस्या निर्माण होत आहेत. गावांतील बीएसएनएल टाॅवर असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे सुसज्ज इंटरनेट यंत्रणेसाठी जिओ टाॅवरची नितांत आवश्यकता या दोन्ही गावांना आहे. आमदार नितेश राणे यांनी जिओ टाॅवर उभारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु असे आश्वासनही या वेळी दिले. आमदार नितेश राणे दिल्या शब्दाला जागणारे म्हणून अख्खा महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या आश्र्वासनानंतर या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनमध्ये आशेचे नवे किरण निर्माण झाले आहे.
यावेळी कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, म्हापण माजी सरपंच गुरूनाथ मडवळ, ग्रामपंचायत सदस्य संजोग परब, गुरुप्रसाद चव्हाण, संदीप खोत, विजय ठाकुर व ग्रामस्थ उपस्थित होते.
*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*
*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..
🍢गोबी मंचुरी ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली ₹40/-
🥟स्टीम मोमो ₹20/-
*_🤷🏻♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..
*_🙋🏼♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_