खेड मध्ये रिपाइंचे सोमवारी ठिय्या आंदोलन; सुशांतभाई सकपाळ..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : खेड
🎴खेड,दि.१४: तालुक्यातील भडगाव, भरणे-बाईतवाडी ते बौद्धवाडी येथे शासनाच्या विशेष घटक योजनेच्या मागासवर्गीय निधीचा गैरवापर करणाऱ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन छेडले जाणार आहे. येथील बौद्धवाडीची कोणतीही मागणी नसताना पूल बौद्धवाडी साठी असल्याचे भासवत २० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या पुलाचा लाभ स्वतः च्या मालमत्ते कडे जाण्यासाठी नगराध्यक्ष वैभव खेडकर यांना होणार असून हा पूल बौद्ध समाजासाठी कुठल्याही प्रकारे फायदेशीर ठरणार नाही. स्वतःच्या फायदासाठी शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी ज्यांचा संबंध आहे, त्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा. अशी मागणी रिपाइं चे कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांतभाई सकपाळ यांनी यापूर्वी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. याच पार्श्वभूमीवर हे ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सुशांतभाई सकपाळ यांनी कळविले आहे.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

