कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसिंधुदुर्ग

🛑कोकणाला घोषणांची नाही तर– धडाडीच्या, सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज.

*🛑कोकणाला घोषणांची नाही तर– धडाडीच्या, सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज.*

 

*🛑सिंधुदुर्गासह कोकणात शिवसेना वाढवायची असेल तर आमदार निलेश राणे यांना मंत्रिपद द्या – कार्यकर्त्यांची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १६:-* आज राज्याचे गृह व ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम कोकण दौऱ्यावर आले, पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी घेऊन. यासाठी सिंधुदुर्गात त्यांनी पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतले,शिवसेनेला ताकद देण्याचे काम केले पण खरी गोष्ट अशी आहे की, कदमांकडे वडिलांचा अनुभव असेल,मंत्रीपदाची झालरही असेल पण कोकण जिंकायचा असेल, तर केवळ अनुभव पुरेसा नाही. कोकणाला भिडायचं असेल, तर आक्रमकता हवी, धाडस हवं, आणि जमिनीवर लढण्याची कला हवी! ती कला राणे घराण्याच्या रक्तात आहे.

कोकणातील शिवसेना जर खरंच विस्तारायची असेल, तर मऊ बोलून, कागदोपत्री सभा घेऊन ते शक्य होणार नाही. या भागाला धाडसी, आक्रमक आणि लोकांमध्ये मिसळणारं नेतृत्व हवंय. निलेश राणे हेच ते नेतृत्व आहे जे विरोधकांच्या छाताडावर घाव घालू शकतं आणि जनतेच्या मनात आपलेपणा निर्माण करू शकतं.निलेश राणेंनी अनेक वेळा. हे दाखवून दिलंय की, विरोधक कितीही मोठे असले तरी त्यांच्या समोर उभं राहण्याची धमक त्यांच्यात आहे. मग ते मुंबईत शिवसेनेला दिलेली सरळ आव्हान असो, की संसदेतून दिलेली गर्जना असो, विधानसभेत गाजवलेले जनतेच्या हिताचे मुद्दे असोत,किंवा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सज्जड सुनावलेलं असो – प्रत्येक वेळी त्यांनी दाखवून दिलं की राणे घराण्याचा वारसा केवळ नारायण राणेपुरता मर्यादित नाही, तो निलेश राणे यांच्यातही तितकाच ठासून भरलेला आहे.

होय आम्ही आमच्या पस्तीस वर्षातील पत्रकारितेतील अनुभवाच्या जोरावर सागतो निलेश राणे हे नाव घेतलं की लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहते ती थेट भिडणाऱ्या तरुण नेत्याची प्रतिमा. त्यांनी खासदार असताना घेतलेल्या आक्रमक भूमिका, केंद्रात बसून कोकणातील प्रश्न मांडण्याची क्षमता, तसेच स्थानिक पातळीवर पाणी, वीज, रस्ते यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवरविधानसभेत सरकारला धरलेले धारेवर – हे सगळं लोकांच्या लक्षात आहे. मुंबईतल्या रस्त्यांपासून दिल्लीच्या संसदेतपर्यंत निलेश राणेंनी विरोधकांना कधीही उघडपणे धारेवर धरलं. कोकणच्या विकासासाठी तडजोड नाही ही त्यांची भूमिका होती, आहे आणि राहणार आहे.

निलेश राणे हे नाव घेतलं की जनतेसमोर उभं राहतं ते थेट भिडणाऱ्या, सरळ बोलणाऱ्या, बिनधास्त लढणाऱ्या तरुण नेत्याचं चित्र. खासदार असताना दिल्लीच्या संसदेत त्यांनी कोकणचे प्रश्न उभे केले, मुंबईच्या रस्त्यावर शिवसेनेच्या आक्रमकतेला आक्रमकतेनं उत्तर दिलं, आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांवर सज्जड सुनावलं. हीच ती स्टाईल – जी कोकणात लोकांना भावते.

कोकण हा भावनांचा प्रदेश आहे. येथे जनतेला हवे असते कृतीशील नेतृत्व, जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढणारे नेतृत्व. आपल्या जिल्ह्यच्या विकासासाठी प्रसंगी सरकारशी पण दोन हात करणारे नेतृत्व, फक्त बडबड, दिखावा आणि बनावट फोटोशूट्स इथे चालत नाहीत. येथील जनता दुधखुळी नाही ती प्रत्येक गोष्ट जाणते ,तीचा अभ्यास करते,मगच आपले मत ठरवते,त्यामुळे जर शिवसेनेला खरंच कोकणात पाय रोवायचे असतील, तर घोषणांनी , संपर्कमंत्री पाठवून,सभा घेऊन,आढावा घेऊन काही साध्य होणार नाही. निलेश राणेंना पूर्ण ताकद द्या, मंत्रीपद द्या आणि मैदानात उतरवा!

आमदार निलेश राणे विरोधकांना भिडायला घाबरत नाहीत. मग तो मुंबईतला सामना असो किंवा सिंधुदुर्गातील संघर्ष, प्रत्येक ठिकाणी त्यांनी राणे घराण्याचा ठसा उमटवला. आजही तेच नेतृत्व लोकांच्या मनात जिवंत आहे.म्हणूनच आम्ही ठामपणे सांगतो जर शिवसेनेला कोकणात ताकद वाढवायची असेल, तर निलेश राणेंच्या हातात सत्ता द्या. अन्यथा कोकणातली शिवसेना कागदावर राहील, जनतेच्या मनात नाही व वास्तवात पण नाही.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!