आणखीमहाराष्ट्रसामाजिक

🛑 बीडमध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा, आंदोलक रस्त्यावर; ST प्रवर्गातील मागणीला खासदारांसह 6 आमदारांचा पाठिंबा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बीड, दि-१५:- राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ देत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्याने बहुतांश मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे, ज्याप्रमाणे हैद्राबाद गॅझेटियरमध्ये मिळालेल्या नोंदीनंतर मराठा समाजाला ओबीसीप्रवर्गातून (OBC) आरक्षण देण्याचा जीआर काढला.

त्याचप्रमाणेगॅझेटियर नोंदीचा संदर्भ घेऊन बंजारा समाजानेही एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. राज्यभरातूनबंजारा समाज (Banjara community) एकटवत असून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. त्यातच, आज बीडमध्ये (Beed)बंजारा समाज मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरला असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा मोर्चा काढण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. बीडसह जालन्यातही आज बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी एकमेकांच्या विरोधात उभा टाकलेले नेते बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. बंजारा समाजाच्या आजच्या मोर्चाकडे राजकीय नेत्यांनी पाठ फिरवली आहे, मात्र बंजारा समाज मोठ्या संख्येनंमोर्चात सहभागी झाला आहे. राज्यातील मराठा आरक्षणाचा आंदोलनाचे केंद्रस्थान म्हणजे बीड. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना सर्वाधिक पाठिंबा मिळालेला जिल्हा म्हणजे ही बीड. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते, ओबीसी जनता, मराठा नेते, मराठा जनता येथे एकमेकांविरोधात उभा राहिलेला जिल्हाही बीड. या जिल्ह्यात बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वच नेते एकवटलेले पाहायला मिळाले.

 

बीडमधील खासदारांसह 6 आमदारांचा पाठिंबा

 

बीड लोकसभेचे खासदार बजरंगसोनवणे यांनी उघडपणे बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. धनंजय मुंडे बंजारा समाजासाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. सुरेश धस , विजयसिंह पंडित नव्हे, तर जिल्ह्यातील सर्वच 6 आमदारांनी बंजारांच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसोबत उभं राहण्याची भूमिका घेतली आहे.

 

आगामी निवडणुकांसाठीबंजारा समाजाचं मतदान निर्णायक

 

आगामी स्थानीक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाचा मोर्चा म्हणजे राजकीय नेत्यांसाठी मोठं आव्हान आहे. बंजारा समाजाचा पाठिंबा मिळाला, तर अनेक जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गणात विजय निश्चित मानला जातो. आमदार सुरेश धस, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, खासदार बजरंगसोनवणे यांना बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी पाठिंबा द्यायला काहीच अडचण नाही. कारण, हैदराबादमध्ये तशा नोंदी सापडलेल्या आहेत. दुसरीकडे धनंजय मुंडे यांना या मोर्चात सहभागी होण्याला अडचण नव्हती. कारण, बंजारा समाज हा ओबीसीचा भाग आहे, याशिवाय आरक्षणाच्या मुद्द्यावरून या पाठिंब्यानंअस्थिरतेचा भागही असू शकतो. मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीने महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना डगमगायला लावलं. मराठ्यांच्या मोठ्या लोकसंख्येमुळे आणि आंदोलनशक्तीमुळे सरकारला अखेर निर्णय घ्यावा लागला. आता तसंच चित्र बंजारा समाजाच्या आंदोलनात दिसत आहे. हैद्राबादगॅझेटियरचा संदर्भ, मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी आणि बंजारांची लोकसंख्या या सगळ्यांच्या एकत्रित परिणामामुळे बीडमध्येबंजारा समाजाचा मोर्चा राजकीय दृष्टीने अतिशय निर्णायक ठरत आहे

 

दरम्यान, बीडसह जालन्यातही बंजारा समाजाचा एल्गार पाहायला मिळाला, सध्या व्हेजेएनटीप्रवर्गात असलेल्या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी हा महामोर्चा काढण्यात आला.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!