🛑 विकास दिवसानिमित्त वेंगुर्ला येथे १७ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ला, दि-१५:- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात “विकास दिवस” विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने युवक आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग तर्फे तसेच वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विविध सामाजिक संस्था च्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे सलग ३३ वे रक्तदान शिबिर आहे.
सदर रक्तदान शिबिर १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे पार पडणार आहे. शिबिराला स्थानिक युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.या शिबिराच्या माध्यमातून समाजातील तरुणाईला सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्याबरोबरच, रक्ताची तातडीची गरज भागविण्यासाठी महत्त्वाचे योगदान मिळणार आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून युवक-युवतींसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मेरा युवा भारत सिंधुदुर्ग चे उप संचालक कालिदास घाटवळ आणि वेताळ प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

