आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीय

🛑 राजापूर तालुक्यातील ओणी-पाचल-अनुस्कुरा मार्गावरील खड्डे सकाळी बुजवले, संध्याकाळी उखडले, ग्रामस्थ संतप्त

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴राजापूर, दि-१५:– राजापूर तालुक्यातील ओणी-पाचल-अणूस्कुरा मार्गावरील खड्ड्यांनी प्रवाशांचे आयुष्य अक्षरशः धोक्यात आणले आहे. रविवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरले आणि संध्याकाळी लगेचच उखडले.यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. गेल्या तीन महिन्यांत चार वेळा खड्डे बुजवण्याचे काम झाले, मात्र प्रत्येक वेळी केवळ खडी टाकून केलेली मलमपट्टी दोन दिवसातच उखडते. परिणामी चाकरमान्यांना आणि स्थानिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

पाचल आणि परिसरातील ग्रामस्थांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून १७ सप्टेंबर रोजी पाचल बाजारपेठेत आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी स्वरूपात दिला आहे. या इशाऱ्याची दखल घेत विभागाने घाईगडबडीत पुन्हा खडी टाकून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. मात्र आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यांची ठाम मागणी आहे की, रस्ता डांबरानेच पक्का करण्यात यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!