कणकवली बस स्टँड समोर जाळला खासदार विनायक राऊत यांचा पुतळा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१३: शिवसेना-राणे वादाचे लोण आता कणकवलीत पोचले असून एसटी स्टँडसमोरील राणे संपर्क कार्यालयाजवळ भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जोडयानी बडवून जाळला.

राज्यसभा खासदार नारायण राणेंना नॉन मॅट्रिक अशा शब्दांत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी डीवचल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी ” जिथे दिसशील तिथे फटकवणार ” अशा शब्दांत राऊत यांना मुलाखतीतून दम देत राऊत म्हणजे मातोश्री वरील वॉचमन असे हिणवले होते. साहजिकच राऊत आणि राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद सिंधुदुर्गात उमटून शिवसैनिकांनी निलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे लागवले. तर भाजपा कार्यकर्त्यांनी सावंतवाडीत खासदार राऊत यांचा पुतळा बडवला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकीय केंद्र असलेल्या कणकवलीत अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेत दंगा काबू पथक शनिवारी सकाळपासून तैनात करण्यात आले आहे. मात्र भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत कणकवली एसटी स्टँडसमोरील राणे संपर्क कार्यालयाजवळ खासदार राऊत यांचा पुतळा सायंकाळी ५ वा. च्या सुमारास जाळला. यावेळी आक्रमक भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना आणि खासदार राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

यावेळी भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष संतोष कानडे, भाजपा शहर तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पं स सभापती मनोज रावराणे, तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, महिला तालुकाध्यक्षा हर्षदा वाळके, शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, तालुका सरचिटणीस, रमेश पावसकर नगरपंचायत बांधकाम सभापती मेघा गांगण, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख बबलू सावंत, नगरसेवक शिशिर परुळेकर, पं स सदस्य सुजाता हळदिवे, संजना सदडेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन पाडावे, पप्पू पुजारे, सुभाष मालंडकर आदी उपस्थित होते.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!