कणकवलीक्राइमशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कोकण रेल्वेत नोकरीचे अमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी रतन कांबळे गजाआड..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२४: कोकण रेल्वेत नोकरीचे अमिष दाखवून कणकवली शहरालगत गावातील युवतीवर बलात्कार व खोटे नाव सांगत लग्न,​ ​शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.​ ​त्या प्रकरणी गुन्हे दाखल करत आरोपी रत्नु उर्फ रतन विष्णू कांबळे (वय ४२, रा.कणकवली, नागवे रोड) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला अटक केल्यानंतर तपासी  महिला अधिकाऱ्यांना आरडाओरडा करत शासकीय कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा आरोपीवर दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,​ कणकवली शहरात दुकानात काम करणाऱ्या एका युवतीला रतन कांबळे याने रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवत जवळीक वाढवली होती. त्यानंतर त्या युवतीवर बेलापूर येथील कोकण भवनला जाऊयात असे सांगत लॉजवर जात ३ वेगवेगळ्या वेळी जुलै २०१९​ ​पासून शारीरिक सबंध अत्याचारही केला होता. याबाबत युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार रतन कांबळेवर भा. दं. वि. ३७६ व अन्य कलमानुसार  गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

त्यानंतर​ ​आरोपी रतन कांबळे यांची अटक प्रक्रिया करत असताना शासकीय कामात अडथळा केला.​ ​त्यानंतर लघुशंकेला जातो असे सांगत हाताला जखम करुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल असून आरोपी रतन कांबळे यांच्याविरोधात भा.दं.वि. ३५३ नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता बलात्कार प्रकरणात २७ जानेवारी पर्यत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*

🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊

   _*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_

_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_

*🤷🏻‍♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻‍♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!