आशिये व ओझरम ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडी जाहीर..
▪️आशिये सरपंचपदी शारदा गुरव तर ओझरम ग्रामपंचायत सरपंचपदी सुनील राणे यांच्या बिनविरोध निवडी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१२: तालुक्यातील आशिये व ओझरम दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडी आज जाहीर झाल्या. यात आशिये सरपंचपदी शारदा गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर ओझरम ग्रामपंचायत सरपंचपदी सुनील राणे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. या दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता होती. ती सत्ता टिकविण्यात भाजपाला यश आले. दुपारी एक वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आली. व त्यानंतर विशेष बैठकीत सरपंच निवड करण्यात आली. आशिये ग्रामपंचायत सरपंचपदी यापूर्वी रश्मी बाणे या थेट निवडून आलेल्या सरपंच होत्या. मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. तो अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सरपंचपद रिक्त होते. ही ग्रामपंचायत यापूर्वीही भाजपाकडे होती. व आताही भाजपाच्या ताब्यात राहिली. तर ओझरम सरपंच यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत सुनील राणे हे सरपंच झाल्याने याही ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा राहिला. सुनील राणे हे यापूर्वी ओझरम ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून कार्यरत होते. त्यांना पक्षाकडून बढती देत सरपंचपदी त्यांची वर्णी लावण्यात आली. आशिये व ओझरम ही रिक्त सरपंचपदे थेट निवडीतून भरण्यात आली होती. मात्र त्यानंतर शासनाने सरपंच निवडीबद्दल सदस्यांमधून सरपंच निवडण्याचे ठरविल्याने आता रिक्त सरपंच पदे ग्रामपंचायत सदस्यांमधूनच निवड करण्यात आली. दोन्ही नवनिर्वाचित सरपंचांचे भाजपा तालुकाध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. आशिये सरपंचपदी निवड झाल्याबद्दल शारदा गुरव यांचे कणकवली माजी उपसभापती महेश गुरव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. तर ओझरम् सरपंच निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंचांचे ग्रा. पं. सदस्य प्रशांत राणे, विशाखा तांबे, समृद्धी राणे, माजी सभापती विनायक राणे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास राणे, रुपेश राणे, उमेश राणे, संदीप राणे, योगेश राणे, ग्रामसेवक बोडेकर आदींनी अभिनंदन केले.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_