विकास कामे करणाऱ्यांच्या पाठीशी राहण्याची खेर्डी ग्रामस्थांची परंपरा कायम..

▪️खेर्डी ग्रामस्थ मंडळींच्या पाठीशी सुखाई परिवर्तन पॅनल चे सर्व शिलेदार सदैव पाठीशी राहणार; रुपेश आवले

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.२०: खेर्डी गावातील ग्रामस्थ मंडळी नेहमी विकासकामे करणाऱ्यांच्या आणि जनतेशी उत्तम जनसंपर्क असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव राहिली आहे,सुखाई परिवर्तन पॅनल चे प्रमुख काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष  आमचे नेते प्रशांतजी यादव ,जयंद्रथ खताते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीध्ये निवडून आलेले आमचे शिलेदार दिलेला शब्द पूर्ण करून सदैव ग्रामस्थांच्या पाठीशी राहतील अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष रुपेश आवले यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

खेर्डी ग्रामपंचायत निवडणुकीत सुखाई परिवर्तन पॅनल चे सर्वच कार्यकर्ते अगदी इर्षेने प्रचारात व्यस्त होते,दुसऱ्या बद्दल वाईट बोलून मत मागण्या पेक्षा आम्ही जनतेला काय विकास देऊ या गोष्टीवर आम्ही प्रचारात जोर धरला होता याचे फलित निवडणूक निकालातून आम्हाला मिळाले, आमचे नेते प्रशांतजी यादव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खेर्डी वासीयांसाठी सदैव कटिबद्ध आहोत असे आवले म्हणाले,विरोधकांनी प्रचारात जनता दरबार घेणार सांगितले पण आम्ही जनता दरबार घेऊन ग्रामस्थांना आमच्या मागे फिरत बसविण्या पेक्षा आमचे निवडून आलेले सर्वच शिलेदार जनतेच्या दरबारात घरोघरी जाऊन समस्या जाणून घेतली असे आवले यांनी सांगून सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून खेर्डी ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*

🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊

   _*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_

_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_

*🤷🏻‍♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻‍♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!