काजु बी ला याेग्य भाव मिळावा; शेतकरी,व्यापारी,कारखानदारांची संयुक्त बैठक
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१०: काजु बी ला याेग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी, व्यापारी, कारखानदार यांची संयुक्त बैठक तहसिलदार यांच्या माध्यमातुन घेण्याचा निर्णय सावंतवाडी, दोडामार्ग तालुका शेतकरी व फळबागायतदार संघटनेच्यावतीने बुधवारी डेगवे माऊली मंदिरात झालेल्या बैठकित घेण्यात आला.
संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. योग्य भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगला दर देणारा खरेदीदार शोधुन त्याला काजु विक्री करतील. त्यासाठी संघ गावागावात काजु खरेदी करुन चांगला भाव देणाऱ्या खरेदीदाराला घालतिल. अशावेळी कुणीही व्यापाऱ्याला खरेदीला आडकाठी करु नये यासाठी प्रथम व्यापारी आणि कारखानदार यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले.
यापुर्वी कुषी उत्पन्न बाजार समितीने काजु खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी विरोध झाला होता. असा प्रसंग पुन्हा उद्भवू नये यासाठी बैठक घेण्याचे ठरले.
बैठकीत काजुला खर्चाच्या तुलनेत दर मिळत नाही. काजु पिक घेणारा शेतकरी जैसे थे आहे. त्याच्या परीस्थितीत सुधारणा होत नाही. तो गरीबच राहीला. मात्र, काजु खरेदी करणारा व्यापारी, कारखानदार अधिकाधिक श्रीमंत होत गेला. शेतकरी संघटीत नसल्याने त्याना योग्य भाव मिळत नाही. ही परीस्थिती बदलण्याची गरज प्रकाश वालावलकर यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या काजुला योग्य दर मिळावा यासाठी संघटनेमार्फत पाऊले उचलण्यात येतील. त्यासाठी शेतकऱ्यांनीही संघटनेच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन केले. विलास सावंत यांनी योग्य भावाने काजु खरेदी करणारे खरेदीदार संघटनेमार्फत शोधण्यात येत आहेत. प्राथमिक चर्चाही या खरेदीदाराशी झाली आहे. मात्र तेवढा काजु मिळाला पाहीजे. त्यासाठी गाववार काजु देणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करावी असे आवाहन केले.
उत्तम देसाई यांनी शेतकरी चांगला भाव देणाऱ्या खरेदीदाराला थेट काजु विकतात. मात्र खरेदीदारावर दबाव येतो. त्यामुळे थेट विक्रीवर परीणाम होतो. अशा खरेदीदारावर दबाव आणुन दर पाडले जातात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांत फुट पाडुन आपला फायदा करुन घेणाऱ्या पासून सावध राहीले पाहीजे. जगदेव गवस यांनी योग्य भाव मिळेपर्यंत काजु बाजारात विक्रीसाठी शेतक-यांनी आणु नये असे आवाहन केले.
सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर अभिलाष देसाई यांनी योग्य भाव मिळावा यासाठी प्रथम व्यापारी, कारखानदार यांच्याशी चर्चा करावी. त्यात तोडगा न निघाल्यास पुढील भुमिका घ्यावी अशी सुचना मांडली. जगदेव गवस यांनी गतवर्षी ९० रुपयांपर्यंत दर काजुला देण्यात आला. मात्र काजु गराचा दर ९००रुपये प्रतिकिलोच आहे. शेतकऱ्यांना काहीच फायदा मिळत नाही. हे चित्र बदलण्याची आवश्यकता विषद करतानाच कारखानदारांचा जीएसटी परतावा शासन देते. त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होत नाही असे सांगितले.
नितीन उर्फ दिवाकर मावळणकर यांनी परदेशातील स्वस्त काजु आणुन येथील काजुच्या दराने विकला जातो. त्यामुळे येथील काजु कमी भावाने खरेदी होतो. त्यासाठी परदेशातील काजुचा आणि येथील काजुचा गर वेगळा करुन विकला पाहीजे. त्यामुळे काजुच्या गराची चव ग्राहकांना कळेल. ज्या चवीचे आणि ज्या दर्जाचे काजु गर खरेदी ग्राहकांना खरेदी करता येईल. त्यामुळे स्थानिक काजुला दरही मिळेल. स्थानिक काजुला जीआय मानांकन आहे. त्याचा फायदा घेतला पाहीजे असे सांगितले.
काजुला किमान आधारभुत किंमत मिळावी , काजु बोंडावर प्रक्रीया उदयोगाना चालना मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे बैठकित ठरले. प्रामुख्याने काजुला यंदाच्या हंगामात याेग्य भाव मिळावा याबाबत बैठकित चर्चा झाली. यावेळी डेगवे सरपंच वैदही देसाई, उपसरपंच प्रवीण देसाई, गुरुनाथ नाईक, अजित देसाई,दशरथ घाडी, सुभाष देसाई, सौरभ सिध्दये, कमलाकर देसाई , मधुकर गावकर, अरुण पंडित, घनश्याम नाईक,अतुल पंडित , नरसिंह देसाई,निलेश परब उपस्थित होते.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_