‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अप्रकार रोखण्यासाठी १४ रोजी शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करवा..
▪️हिंदू जनजागृती समितीच्यावतीने सिंधुदुर्गात पोलीस प्रशासन, महाविद्यालये, हायस्कुल स्तरांवर निवदने..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१०: ‘व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली होणारे अप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन, महाविद्यालये, हायस्कुल स्तरांवर निवदने देऊन करण्यात आली.
यावेळी महाविद्यालय आणि हायस्कूलच्या मुख्याध्यापक यांनी असे डे साजरे करणे ही पाश्चात्यांची संस्कृती असून आपण शाळा महाविद्यालय स्तरावर पुर्णतः बंदी आणली असल्याचे सांगितले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात १४ फेब्रुवारी हा दिवस ‘वहॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमूळे युवापिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पाश्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये बडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच, यादिवशी होणाऱ्या मेजवान्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झाली आहे. इतकेच नव्हे. तर या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत होणारी मोठ्या प्रमाणातील वाढ अनैतिक संबंधांतील वृद्धी दर्शवते. तसेच या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात. मुलींना खोटी नावे सांगून फसवून त्यांना ‘लब्ह जिहाद’चा बळी बनवतात.थोडक्यात ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा-महाविद्यालयाच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत भारतात प्रती १८ मिनिटाला एक बलात्कार होत आहे, महिलांवरील अत्याचारांची भयावह आकडेवारी सध्याची समाजाची ढासळलेली मानसिकता आणि कायदा-सुव्यवस्थेची दुःस्थिती दर्शवतात. या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी काही समाजसेवी संघटना मागील काही वर्षांपासून ‘मातृ-पितृ पूजनदिना’च्या माध्यमातून युवा पिढीसमोर एक आदर्श पर्याय निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सार्वजनिक ठिकाणी आपल्या माता-पित्यांना एकत्र आणून त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्याविषयी सामूहिकरित्या प्रेम व्यक्त करणे, असे या उपक्रमाचे स्वरूप असते. सध्या देशात स्वतःच्या अपत्यांकडून देखभाल होत नसलेल्या वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पाश्चात्त्यांच्या प्रभावामुळे या नव्याने निर्माण झालेल्या सामाजिक समस्येविषयी सरकारही चिंतित असून त्याविषयी सामाजिक दृष्टीकोनातून प्रबोधन करत आहेत. ‘मातृ-पितृ पूजनदिन’ या उपक्रमातून आपल्या माता-पित्यांना सौजन्य आणि सन्मान देण्याची भावना वाढीस लागते. त्यामुळे ‘मातृ-पितृ पूजनदिना’चे आयोजन करणे, हे एक प्रकारे शासकीय धोरणांना प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. शालेय स्तरांवर असे दिवस साजरे होत नसले, तरी प्राथमिक-माध्यमिक वर्गातील विद्यार्थीच पुढे युवक बनून महाविद्यालयांत जात असल्याने असे दिवस साजरे न होण्यासाठी त्यांचेही प्रबोधन होणे आवश्यक आहे. तरी शाळांमधूनही ‘मातृ-पितृ पूजनदिन’ हा उपक्रम साजरा होण्यासाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सावंतवाडी येथील पोलीस ठाणे अंमलदार ज्ञानेश्वर गवस , पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, राणी पार्वती देवी कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्यध्यापक बाळासाहेब पाटील, बांदेकर आर्टस् कॉलेज, देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे निवेदने देण्यात आली. यावेळी हिंदूजनजागृती समितीचे सर्वश्री चंद्रकांत बिले, गणेश पेंढारकर, राजेंद्र शिरोडकर अधिवक्ता वैभव चव्हाण आदी उपस्थित होते.
*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*
⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊
*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*
🙅🏻♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥
*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*
💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡
_*🤷🏻♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_