कृषिराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केल्यास मोठा उद्रेक होईल; अशोक दळवी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२०: तालुक्यातील बहुतांशी गावांना ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भात शेतीचे तसेच बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावे अशा प्रकारचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच सावंतवाडी तालुक्यांमध्ये गेल्या वर्षी झालेल्या पूर्ण अतिवृष्टीमुळे शेती व बागायत वगैरे यांचे नुकसान भरपाई तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मिळाली नाही. वारंवार शेतकऱ्यांनी प्रशासकीय कार्यालयात महसूल कार्यालयात फेऱ्या मारून सुद्धा आर्थिक भरपाई अद्याप पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्याला संपूर्णपणे प्रशासनातील कर्मचारी जबाबदार आहेत. महसूल किंवा कृषी विभाग यांच्यात समन्वय नसल्याने एकमेकांकडे बोट दाखवले जात आहेत. दोन्ही कार्यालयात गेल्यानंतर शेतकऱ्यांना उलट माहिती देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची कुचेष्टा केली जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याची योग्य दखल घेणे गरजेचे असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न चालू आहे. याबाबत कृषी व महसूल विभागाने योग्य ती दखल न घेतल्यास संयुक्‍तपणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा सावंतवाडीचे माजी सभापती व शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!