कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

‘टोल’चे भूत कोकणात नको; शौकत मुकादमांचा इशारा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.१०: मुंबई-गोवा महामार्गावर टोल नाके उभारून टोल वसूल केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हा हा डोंगरी विकासामध्ये अंतर्भूत त्यामुळे येथे टोल नको; जबरदस्तीने ते लादण्याचा प्रयत्न केल्यास टोल नाके उखडन फेकन देऊ असा खरमरीत इशारा अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतक मंत्री नितीन गडकरी यांना पाठवले आहे. महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी, अपघातमुक्त आणि जलद व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. काम अद्याप पूर्ण देखील नसताना येथे टोल नाके उभारण्याचे प्रयोजन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. कोकणासाठी पहिलाच असा मोठा प्रकल्प उभारला जात असताना लगेच त्याची वसुली करण्याचा हा प्रयत्न दुर्दैवी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गहागर बिजापर मार्गावर अशाच प्रकारे सती येथे टोल नाका उभारण्यात आला होता. मात्र, स्थानिक जनतेने त्यासाठी तीव्र असे आंदोलन केले. आमच्यावर गुन्हे दाखल झाले. न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केले. अशी आठवण करून त्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकल्पावर टोल लावायचा असेल तर त्याची प्रसिद्धी राजपत्रामध्ये करावी लागते. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावर टोल लावला जाईल असे केंद्रीय मंत्रालयाने बजेट मध्ये प्रसिद्ध केलेले नाही. त्यामळे या मार्गावर टोल लावताच येणार नाही, असे चिपळूणचे शौकत मुकादम यांनी नमूद केले आहे.

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_

💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..

_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻‍♂️*_

*💁🏻‍♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻‍♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!