सिंधुदुर्ग पोलीसांनी सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना पोलीस संरक्षण द्यावे; सो.ना. कांबळे
▪️सरकारी अधिकारी, ठेकेदार व धरणाची घळभरणी करु देणाऱ्या गावातील पुढाऱ्यांपासून कांबळे यांच्या जीवितास धोका..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.०३: तानाजी कांबळे हे आमच्या रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरिक्षक आहेत. ते अरुणा प्रकल्पात घरे बुडालेल्या प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून योध्दासारखे काम करीत आहेत. सरकारी अधिकारी, ठेकेदार आणि धरणाची घळभरणी करु देणारे गावातील पुढारी यांच्यापासून कांबळे यांच्या जीवितास धोका आहे. पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष असतांना यापुवीँ त्यांच्यावर जीवघेणा प्राणघातक हल्ला झालेला आहे. त्यांच्या जीवाला आजही धोका कायम आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेवून सिंधुदुर्ग पोलीसांनी सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त सन्मानित सो.ना. कांबळे यांनी केली आहे.
तानाजी कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील बेधडक, लढावू कार्यकतेँ आहेत. ते तत्वाशी तडजोड करीत नाहीत त्यांचे हे कार्य अनेकांना खुपत आहे. परंतु परिणामांची पर्वा न करता ते सिंधुदुर्ग सारख्या अविकसित ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिक पणे काम करीत आहेत.
पुनर्वसन कायद्या प्रमाणे प्रकल्प ग्रस्तांना देय असलेल्या सोई सुविधा न देता या प्रकल्पाची बेकायदेशीर घळभरणी करुन अरुणा प्रकल्पग्रस्तांची १३० घरे धरणाच्या पाण्यात बुडालेली आहेत. गरिबांची घरे बुडविण्याचा अधिकार कोणत्याही कायद्याने कुणालाही दिलेला नाही. असे ही समाजभुषण सो.ना. कांबळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, अरुणा प्रकल्पग्रस्तांची एकजूट अनेकांना नको आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांनी गेली दोन वर्षे ठेकेदार, प्रशासनातील अधिकारी आणि गावातील पुढाऱ्यांनी प्रकल्पात संगनमताने केलेल्या भ्रष्टाचाच्या विरोधात तानाजी कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रणशिंग फुंकले आहे. हे सर्व जन आज ना उद्या अडचणीत येणार आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांचा लढा संवणिण्यासाठी त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तानाजी कांबळे यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी समाजभुषण सो.ना.कांबळे यांनी केली आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

