युवासिंधु फाऊंडेशनच्या सदस्या कु. प्रणिता कोटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम..
▪️सिंधुदुर्गनगरीत सफाई कर्मचाऱ्यांना साडी, शर्टपीस व तुळशी वृंदावन भेट..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सावंतवाडी,दि.०९: युवासिंधू फाउंडेशनच्या संकल्पनेतून युवासिंधु फाऊंडेशनच्या सदस्या कु. प्रणिता कोटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्या रुग्णालय तसेच अणाव आनंदाश्रय येथे सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आले.
युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून ओरोस येथील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन कोविडच्या काळात मोलाचं योगदान देणाऱ्या येथील साफसफाई कामगारांच्या कार्याचा गौरव करत त्यांना महिलांना साडी, पुरुषांना शर्टपीस, तुळशी वृंदावन देऊन गौरविण्यात आलं.
कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक मा. डॉ. पाटीलसाहेब, श्री. कलंबीस्तकर, ॲड. भक्तराज राऊळ यांच्या हस्ते गौरव समारंभ संपन्न झाला यावेळी साफसफाई कामगार, रूग्णालयाचे कर्मचारी वृंद आणि युवासिंधु फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.
अणाव येथील आनंदाश्रयाला भेट देऊन तेथील आजी-आजोबांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला गेला त्यानिमित्ताने आनंदाश्रयला आवश्यक असे डायपर, साड्या अशा भेटवस्तू देऊन त्यांच्यासोबत काही क्षण आनंदात घालवता आला.
कार्यक्रमाच्या वेळी बोलताना अतिरिक्त शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे श्री डॉ. पाटील तसेच आनंदाश्रयचे श्री गोविंद परब यांनी वेळोवेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवासिंधु फाऊंडेशनच्या सर्वच युवा सदस्यांचे कौतुक केले.
कु. प्रणिता कोटकर म्हणाल्या कि, ” मला काय गरजेचे आहे यापेक्षा माझी गरज कुठे आहे, याची जाणीव मला जेव्हा झाली त्यावेळेपासून मी समाजकारणास सुरुवात केली. आणि हा समाजकार्याचा वसा युवासिंधु फाउंडेशनच्या माध्यमातून असाच वर्षानुवर्षे आम्ही चालवू.” त्यानंतर त्यांनी युवासिंधु फाऊंडेशनच्या वतिने श्री भक्तराज राऊळ, पुष्पलता रामचंद्र माजगावकर ताई, यांचेही मनःपूर्वक आभार मानले.
प्रणिता कोटकर यांच्या आदरणीय शिक्षिका कै. स्मिता टिकम-राऊळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व आपल्या वाढदिवसानिमित्त समाजातील महत्वाच्या घटकांसाठी उचलेला हा खारीचा वाटा नक्कीच आदर्श घेण्यासारखा आहे.
कार्यक्रमाच्यावेळी सागर नाणोसकर, ओंकार सावंत, नंदिनी धानजी, साईश सावंत, सौरभ पडते, सोनु गवस, विनय वाडकर, सोमेश्वर सावंत, मुन्ना आजगावकर आदी युवासिंधु फाउंडेशनच्या सदस्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.
*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*
⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊
*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*
🙅🏻♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥
*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*
💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡
_*🤷🏻♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

